Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २८० नवे कोरोनाबाधित : ३१८ कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 22:10 IST2021-06-18T22:10:04+5:302021-06-18T22:10:24+5:30
सद्यस्थितीत शहरात २ हजार ६५८ सक्रिय रुग्ण आहेत.

Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २८० नवे कोरोनाबाधित : ३१८ कोरोनामुक्त
पुणे : शहरात शुक्रवारी दिवसभरात २८० कोरोनाबाधित आढळून आले असून, ३१८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात २ हजार ६५८ सक्रिय रुग्ण आहेत.
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ९५१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.७० टक्के इतकी आहे. तर आज १९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ४०९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६११ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ०४ हजार ६३८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७५ हजार ३७७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६४ हजार २०३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५१६ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------