Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २६८ नवे कोरोना रुग्ण तर २३२ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 18:48 IST2021-06-29T18:47:41+5:302021-06-29T18:48:36+5:30
पुणे शहरात गंभीर रूग्ण संख्या ही २८८ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२५ इतकी आहे.

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २६८ नवे कोरोना रुग्ण तर २३२ जणांची कोरोनावर मात
पुणे : शहरात मंगळवारी २६८ कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात २३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.आजमितीला शहरात २ हजार ३२० सक्रिय रुग्ण आहेत.आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ३६२ संशयितांची तपासणी करण्यात आली. आज १४ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २८८ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ६१ हजार २५८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७८ हजार ९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६७ हजार १०६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.