शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पुण्याचे कारभारी कोरोना उपचारासाठी 'खासगी' त अन् नागरिक कुठे म्हणे 'सरकारी'त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 19:06 IST

पालिकेच्या आरोग्य सुविधांवर नागरिकांचा कसा वाढणार विश्वास

ठळक मुद्देपालिकेच्या रुग्णालयात चांगल्या सुविधा असल्याचा दावा;अधिकारी,नगरसेवक खासगी रुग्णालयात

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर्स उभे करून तेथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत. एकीकडे पालिकेच्या रुग्णालयात चांगल्या सुविधा दिल्या जात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी दुसरीकडे मात्र पदाधिकारी-अधिकारी आणि नगरसेवक मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचा शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास वाढणार कसा असा प्रश्न आहे.

 कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेण्यापेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नागरिकांचा कल अधिक आहे. पालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांवरून अनेकदा प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला आहे. नागरिकांकडून अनेकदा याबाबत प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनावर आजवर अडीचशे ते तीनशे कोटींच्या घरात खर्च झाल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे. या खर्चाचा तपशील मात्र आद्यप मिळू शकलेला नाही. असे असतानाही उपचरांकरिता पालिकेच्या दवाखान्यात न जाता नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावेसे वाटतात.

 बहुतांश नागरिक खासगी रुग्णालयात खाटा मिळत नाहीत अशी ओरड करीत आहेत. नाईलाजस्तव शेवटचा पर्याय म्हणून पालिकेच्या कोविड केअर सेंटर्सकडे पाहिले जाते. पालिकेने काही खासगी रुग्णालयांशी करार केला असून तेथे नागरिकांवर उपचार करण्याकरिता सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. एकंदरीतच पालिका सर्वसामान्य नागरिकांच्या मनामधून कोरोनाची भीती वळविण्यात आणि सर्वसामान्यांच्या मनात शासकीय आरोग्य सुविधांबाबत विश्वास निर्माण करण्यात पालिका प्रशासन कमी पडत आहे. ------- कोरोना बाधित झालेल्या महापौर, विरोधी पक्षनेत्या यांच्यासह जवळपास आठ ते दहा नगरसेवकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. यासोबतच काही पदाधिकाऱ्यांचे अत्यंत निकटचे नातेवाईकही खासगी रुग्णालयातूनच उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर, पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांनीही खासगी रुग्णालयातील उपचार घेतले. एकीकडे पालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. तर, दुसरीकडे पालिकेतील प्रमुख घटक मात्र खासगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. त्यांनी कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, यामुळे पालिकेच्या वैद्यकीय सुविधेवर त्यांचाच विश्वास नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणhospitalहॉस्पिटल