शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्यातील दुकानांसाठीची पी -१, पी -२ पध्दत रद्द; दुकाने सर्व दिवस सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 18:32 IST

दुकानांबाबतची नवीन नियमावली उशिरा जाहीर करण्यात येणार

ठळक मुद्देदुकाने सर्व दिवस उघडी ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी घेतली दिग्गज नेत्यांची भेट

पुणे : लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील दुकाने उघडी ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेली पी-१, पी-२ ही पध्दत बंद करण्यात आली  आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आता आठवड्यातील सर्व दिवस दुकाने सुरू ठेवता येणार आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या  लॉकडाऊनमुळे सुमारे तीन महिने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. त्यानंतर अनलॉक -१ मध्ये दुकाने उघडण्यात आली. मात्र, रस्त्याच्या एका बाजुची दुकाने एका दिवशी आणि दुसऱ्या बाजुची दुसऱ्या अशी सम-विषम (पी-१-पी-२)पध्दत अवलंबण्यात येत होती. त्यामुळे व्यावसायिकांना सर्व दिवस दुकाने उघडी ठेवता येत नव्हती. याबाबत पुणे व्यापारी महासंघातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती.राज्य सरकारचेच आदेश असल्याने पुणे प्रशासन याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असे व्यापाऱ्यांना सांगण्यात येत होते. मात्र, सोमवारी मुंबई महापालिकेने पी-१,पी-२ पध्दत रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पुण्यातही निर्णय घेतला आहे. याबाबतची नियमावली महापालिकेकडून रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाली आहे. त्यांची उपसचिव या पदावर चार वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारनेच हे आदेश काढले असून तीन आठवड्याच्या आत त्यांना कार्यमुक्त करावे, अशा सूचना केल्या आहेत. राम हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यात चांगली कामगिरी बजावली होती. राम यांच्या जागी जिल्हाधिकारीपदी कोण येणार याबाबत उत्सुकता आहे. राज्य सरकारकडून लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारbusinessव्यवसाय