Corona virus : पुणे शहरातील रुग्णांचा आकडा २ हजार ३८० वर;शनिवारी तब्बल १३५ नवीन रूग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 09:56 PM2020-05-09T21:56:04+5:302020-05-09T21:56:47+5:30

वाढलेले रुग्ण आणि बरे झालेल्या शनिवारची रूग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक

Corona virus : The number of patients in Pune city increased to 2,380; 135 new patients were added on Saturday | Corona virus : पुणे शहरातील रुग्णांचा आकडा २ हजार ३८० वर;शनिवारी तब्बल १३५ नवीन रूग्णांची भर

Corona virus : पुणे शहरातील रुग्णांचा आकडा २ हजार ३८० वर;शनिवारी तब्बल १३५ नवीन रूग्णांची भर

Next
ठळक मुद्देरुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये शनिवारी दिवसभरात तब्बल १३५ नवीन रूग्णांची भर पडली. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ३८० झाली आहे. यासोबतच दिवसभरात तब्बल ९६ रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत. वाढलेले रुग्ण आणि बरे झालेल्या रूग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. दिवसभारत एकूण चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
 शनिवरी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १३५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडू रुग्णालयात १०७ तर खासगी रुग्णालयांमध्ये २३ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात शनिवारी चार मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४० झाली आहे. दिवसभरात एकूण ९६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ७४, ससूनमधील १० तर  खासगी रुग्णालयांमधील १२ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८२६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ४१४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १ हजार ५४३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २१ हजार ८१३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १०११, ससून रुग्णालयात ११३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २९० रुग्ण उपचार घेत आहेत.

 

Web Title: Corona virus : The number of patients in Pune city increased to 2,380; 135 new patients were added on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.