आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 06:35 AM2024-06-03T06:35:01+5:302024-06-03T06:50:08+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 03 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस

आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस

मेष: आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगेसोयरे यांच्या येण्याजाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. गैरसमज होण्याची शक्यता आहे. मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने आपले मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे. आणखी वाचा 

मिथुन: आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदाही होईल. त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पत्नी व संतती ह्यांच्याशी सुसंवाद राहिल्याने दांपत्य जीवनात गोडवा निर्माण होईल. आणखी वाचा 

कर्क: आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख - शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामे शांतपणे व व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आणखी वाचा 

सिंह: आज स्वभावात उग्रता व संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. उतावीळपणामुळे निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायात अडचणी आल्याने नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा 

कन्या: आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रूपासून सावध राहा. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस प्रेमालाप, मनोरंजन व मौज-मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश व कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील. उंची वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दांपत्यसुख व वाहनसुख मिळेल. मनःस्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा 

वृश्चिक: आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल. अपूर्ण कामे तडीस जातील. आर्थिक लाभामुळे खर्च आपला ताण वाढविणार नाही. आणखी वाचा 

धनु: आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य, लेखन व कला ह्या विषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आज वाद - विवाद किंवा चर्चा ह्यात भाग घेऊ नका. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. अडचणीत येऊ शकता. आणखी वाचा 

कुंभ: आज आपण तना-मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्र व स्वजनांच्या सहवासाने आपले मन आनंदीत होईल. कार्यक्षेत्रात कौशल्यपूर्वक उत्तम यश मिळवाल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. मनाचे स्वास्थ्य चांगले टिकवून ठेवाल. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 03 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app