पुणे : शहरात शुक्रवारी ८३० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ५५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवसभरात ७ हजार २६७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ही ११.४२ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहावाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ६६४ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही ३०० आहे. तर शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ६ हजार १६० इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत ११ लाख ७७ हजार ६५० हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ६ हजार ३८३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९५ हजार ३४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८८१ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Corona virus News: 830 corona patients increased in Pune on Friday: 551 corona free
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.