Corona Virus News : पुणे शहरात मंगळवारी १९२५ नवे कोरोनाबाधित; ६७७ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 19:36 IST2021-03-16T19:30:37+5:302021-03-16T19:36:25+5:30
प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार २२५ झाली आहे.

Corona Virus News : पुणे शहरात मंगळवारी १९२५ नवे कोरोनाबाधित; ६७७ जण कोरोनामुक्त
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. मंगळवारी दिवसभरात रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ६७७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३५१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार २२५ झाली आहे.
मंगळवारी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३९४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ७९८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९६९ झाली आहे. पुण्याबाहेरील दोन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ६७७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ३ हजार १६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख २१ हजार २१० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १३ हजार २२५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ८ हजार ४४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ६३ हजार ६९६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.