Corona virus : वैद्यकीय महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना ड्युटीवर बोलावून मनुष्यबळाची कमतरता भरून काढा : उपमुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 03:07 PM2020-07-27T15:07:39+5:302020-07-27T15:11:36+5:30

झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता येत्या पंधरा दिवसांत तातडीने बेडची संख्या देखील वाढवा

Corona virus : Lack of manpower will now be met by putting final year students on duty: Deputy CM | Corona virus : वैद्यकीय महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना ड्युटीवर बोलावून मनुष्यबळाची कमतरता भरून काढा : उपमुख्यमंत्री

Corona virus : वैद्यकीय महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना ड्युटीवर बोलावून मनुष्यबळाची कमतरता भरून काढा : उपमुख्यमंत्री

googlenewsNext
ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय एमबीबीएस, पीजी व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ड्युटीवर बोलवणार

पुणे : पुण्यातील रुग्ण संख्येचा प्रचंड वाढता वेग लक्षात घेता येत्या पंधरा दिवसांत तातडीने बेडची संख्या वाढविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. परंतु बेडची संख्या वाढली तरी आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर कोठून आणणार असा प्रश्न उपस्थित झाला. यावर तातडीने उपाय म्हणून सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या एमबीबीएस, पीजीच्या व नर्सिंगच्या अंतिम वर्षांत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्वरीत ड्युटीवर बोलावून ही मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याचे आदेश पवार यांनी बैठकीत दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

----

खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवा 

खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही पवार यांनी दिल्या. 

----

Web Title: Corona virus : Lack of manpower will now be met by putting final year students on duty: Deputy CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.