शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

Corona virus : शारीरिक व्यायामासारखाच मनाचा व्यायामही गरजेचाच : डॉ. संज्योत देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 7:00 AM

लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम कोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

ठळक मुद्देकोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

राजू इनामदारपुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जगभर लढाई सुरू आहे. सामान्य नागरिकांपासून ते जगभरच्या देशांचे प्रमुख या लढाईत उतरले आहेत. यात सामान्यांचे मनोबल ढासळू नये यासाठी काही मानसोपचार तज्ञही स्वत: होऊन सक्रिय झाले आहेत. डॉ. संज्योत देशपांडे त्यापैकीच एक. त्यांनी रोज फेसबूक संवाद सुरू केला आहे. त्याचा अनेकांना फायदाही होत आहे. या संचारबंदीचा व त्याही अनिश्चित काळासाठी असलेल्या लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.नेमकी त्याचवेळी नाशिक येथे एका युवकाने त्याला कोरोना झाला आहे अशा समजातून आत्महत्या केली अशी बातमी आली.   तोच धागा पकडून लोकमत ने डॉ. देशपांडे यांच्याबरोबर बातचीत केली.नक्की कोणावर आणि काय परिणाम होतो अशा वातावरणाचा?-- सध्या सगळे वातावरणच अनिश्चित आहे. किती काळ हा लॉकडाऊन असेल, त्यातून किती आणि काय नूकसान होणार असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सुदृढ मनाच्या व्यक्तींनीही हताश व्हावे अशा या काळात मानसिक द्रष्ट्या कमकूवत असलेल्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा नूसता विचार केला तरी अंगावर शहारे येतात. त्यामुळेच मी यात सर्वांबरोबरच संवाद साधण्याचा निर्णय घेतला. कमकूवत मनाच्या व्यक्ती फार कमी बोलतात. आतल्याआत विचार करतात. ऊत्तर मिळत नसल्याने खचत जातात. आता सगळे संपले असे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात. त्यांना सावरायला कोणी नसले की मग याचा शेवट नको असलेलाच होतो. हे एक प्रकारचे मानसिक चक्रच आहे. त्यात गूंतत जायला होते व नंतर ते वाढतच जाते.अशा वेळी काय करायला हवे?-- अशा वेळी त्या व्यक्तीच्या निकटच्या लोकांनी त्याच्याजवळ रहायला हवे. त्याच्या भावनांची चेष्टा न करता त्या समजावून घेऊन त्याची समजूत काढायला हवी. प्रसंगी तूझे बरोबर आहे, पण आम्ही तूज्याबरोबर आहोत, यातून आपण बाहेर पडणार आहोत हा विश्वास त्याला द्यायला हवा. इतक्या साध्या गोष्टीनेही मोठा फरक पडू शकतो. त्याचे बिथरणारे मन जागेवर येऊ शकते.प्रत्यक्ष त्या व्यक्तीने काय करायला हवे?-- जे काम करत आहोत त्या कामात लक्ष एकाग्र करावे. हा एक प्रकारचा एक्झरसाईजच आहे. जेवण करत असाल तर जेवण कसे आहे, चव कशी आहे याचा विचार करावा. प्रत्येक वेळी फक्त संकटाचाच विचार करण्याची लागलेली सवय यातून कमी होते. अशा व्यक्तींना छोटीछोटी कामे सांगावीत व त्यात ते गुंतून राहतील असे पहावे.शक्यतो त्यानी स्वत:ही आपल्याला एक दिनक्रम लावून घ्यावा. त्याचबरोबर आपल्याला काय वाटते आहे, नक्की कशाची भीती वाटते आहे याविषयी त्यांनी निकटच्या व्यक्तीबरोबर मोकळेपणाने बोलावे. तसे कोणी नसेल तर काय वाटते ते लिहून काढावे. यातून मन मोकळे होते. त्यावरचा ताण कमी होतो. ताण कमी करण्याचे किंवा तो सहन करण्याची क्षमता वाढवण्याचे हे ऊपाय आहेत. मनोविकाराच्या प्राथमिक स्वरूपात ते फार ऊपयोगी पडतात.आणखी कोणते उपाय आहेत?भूतकाळ भविष्यकाळ यात रमू नये. वर्तमानात रहायला शिकावे. मूख्य म्हणजे जो विषय सुरू आहे, त्याच्याशी संबधित अशा फक्त विश्वासार्ह, खात्रीशीर बातम्याच पहाव्यात, ऐकाव्यात. आताच्या सोशल मिडियात काहीही येत असते. ते वाचनात पाहण्यात आले की त्याचाच विचार येत राहतो. खंबीर होत असलेले मन पुन्हा खचू लागते. त्यामुळे अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. शरीराला मजबूत करण्यासाठी व्यायाम आवश्यक तसेच मन खंबीर करण्यासाठी मनालाही व्यायामाची गरज असते. विशेषत: अशा लॉकडाऊनच्या, कोरोनासारख्या विषाणूच्या विळख्यात सगळे जग सापडलेले असताना ती जास्त असते. म्हणूनच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMeditationसाधना