शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Corona Virus : कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात 'जम्बो' बैठक; शरद पवार व प्रकाश जावडेकरांनी अधिकाऱ्यांना दिला 'कानमंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:03 PM

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांचा देखील सहभाग तितकाच महत्वाचा आहे.

ठळक मुद्देपुण्यातील विधानभवनात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन

पुणे: पुण्यात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही कडक उपाययोजनांसह काही ठोस पावले टाकणे गरजेचे आहे. त्यात शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तात्काळ शोध,कोरोना विषाणू संबंधी जनजागृती यांसारख्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. तसेच कोरोना विरुद्धच्या लढाईत नागरिकांचा सहभाग देखील तितकाच आवश्यक असणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यक्त केले.

पुण्यातील विधानभवनात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि.5) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हजर होते. 

पवार म्हणाले, कोरोनाचा एवढा फैलाव होत असताना देखील पुण्यातल्या नागरिकांना अद्यापही गांभीर्य आलेले नाही. ते स्वतः सह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करत रस्त्यांवर विनामास्क फिरत आहे.ही चिंतेची बाब आहे.अशा व्यक्तींवर प्रशासनाने कडक कारवाई करावी. सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी आरोग्य तपासणी बंधनकारक करावी.त्याचप्रमाणे बांधकाम पूर्ण इमारतींचा देखील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विचार करण्यात यावा असेही पवार यांनी या बैठकीत सांगितले.

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचा दर हा देशात सर्वाधिक आहे. पुण्यातील हा रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग आटोक्यात आणायला हवा. तसेच ज्या भागात रुग्ण संख्या वाढते आहे तिथे जास्तीत जास्त तपासणी चाचण्या, सर्वेक्षण आणि  उपाययोजना कराव्यात. प्रतिबंधित क्षेत्रात जनजागृती वर जास्त भर दिले पाहिजे. त्याचप्रमाणे शहरात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे देखील प्रभावीपणे व्यवस्था निर्माण करून जास्तीत जास्त रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध होईल हे पाहावे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यSharad Pawarशरद पवारPrakash Javadekarप्रकाश जावडेकरcommissionerआयुक्तAjit Pawarअजित पवार