शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 11:46 AM

पुणे शहरात बरे झालेल्यांची संख्या 12 हजारांवर

ठळक मुद्देशहरात दिवसभरात ८०७ रूग्णांची वाढ : ३८९ रुग्ण अत्यवस्थ, ९ जणांचा मृत्यू

पुणे : जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी एका दिवसांत जिल्ह्यात १ हजार १९९ कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली, तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात देखील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. सध्या कोरोना रुग्णांची ही वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात सर्वत्र नागरिकांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहे. लोक सार्वजनिक ठिकाणी साधा मास्क देखील लावत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षित सामाजिक अंतर राखले जात नाही. या सर्व गोष्टीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ----

बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १२ हजारांच्या प

पुणे  शहरातील तब्बल १२ हजार २९० कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले असून एकूण रुग्णांच्या तुलनेत ६२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक ८०७ रूग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १९ हजार ८४९ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६१९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ६ हजार ८७४ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री साडे नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८०७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४३५ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३६१ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३३० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी ०९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६८५ झाली आहे. दिवसभरात एकूण ६१९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ३९९ रुग्ण, ससूनमधील १३ तर  खासगी रुग्णालयांमधील २०७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १२ हजार २९० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार ८७४ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार २५० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख २८ हजार ४४८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

एकूण बाधित रूग्ण : २६१४३पुणे शहर : १९७७७पिंपरी चिंचवड :४१७२कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण :२१९९मृत्यु : ८२२

बरे झालेले :७९२

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका