शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

Corona virus : आता मनाची नाही निदान जनाची तरी..मला आठ दिवसांत रिझल्ट हवा, अन्यथा...: उपमुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 01:35 IST

मुंबईत होऊ शकते मग पुण्यात काय अवघड..?

ठळक मुद्देपुण्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा खुद्द मुख्यमंत्र्यांसमोरच झोल

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : धारावीसारखी झोपडपट्टी कोरोनामुक्त करुन संपूर्ण जगाला, देशाला नवा आदर्श घालून देेते. मुंबई होऊ शकते तर पुण्यात काय अवघड आहे. अधिकाऱ्यांनी आता " मनाची नाही तर जनाची तरी.. मला ही भाषा वापरण्याची वेळ आणून देऊ नका. कोरोनाबाबत आठ दिवसांत मला रिझल्ट हवा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर संतापले..

पुण्यातील आढावा बैठकीत लोकप्रतिनिधिंकडून सांगण्यात आलेली वस्तुस्थिती व अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले प्रेझेंटेशन यात खूपच तफावत आहे. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या आकडेवारीत देखील मोठा घोळ सुरू आहे. पुण्यात तब्बल ४८ हजार सक्रिय रुग्ण असताना जिल्हा प्रशासनाकडून २७ हजार सक्रिय रुग्ण असल्याचे म्हटले.

सक्रिय रुग्णांमध्ये तब्बल २१ हजारांचा फरक समजण्यापलीकडचा आहे. यामुळेच रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. आकडेवारीतील घोळ दुरूस्त करण्यासाठी चार - चार दिवस लागत असतील तर इतर यंत्रणेच काय, अशा स्पष्ट शब्दात व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकारी आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सर्वच अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पुण्यातील कोरोना परिस्थितीत व भविष्यातील नियोजना संदर्भात सर्व प्रशासकीय आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकाबरी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आता एक ऑगस्टपासून संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी विभागीय आयुक्त म्हणून सौरभ राव तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही तातडीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण यंत्रणेला एकत्र घेऊन मुंबईसारखे एका कमांडखाली कंट्रोल करत काम करा. मला आठ दिवसांत रिझल्ट दिसला पाहिजे अशा स्पष्ट सूचना देखील त्यांनी दिला.

प्रशासकीय आढाव्या दरम्यान विभागीय आयुक्त यांनी संपूर्ण जिल्ह्याचा, पुणे महापालिका आयुक्तांनी पुणे शहराची, पिंपरी-चिंचवड आयुक्तांनी त्यांची व जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागाची आकडेवारीसह माहिती दिली.

---डेटा एन्ट्रीतील घोळ न समजण्यापलिकडचात्यानंतर प्रदीप व्यास यांनी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या आकडेवारीतल घोळ मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिला. पुण्यातील आकडेवारीचा घोळ न समजण्यापलिकडचा असल्याचे सांगत, शहरातील उपलब्ध बेडस आणि प्रशासनाकडून दाखविण्यात आलेल्या बेडच्या संख्येत देखील कशी तफावत असल्याचे आकडेवारीसह दाखवले. हा सर्व डेटा एन्ट्रीचा घोळ असल्याचे सांगितले. यामुळेच रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.-----दोन आयएएस अधिकाऱ्यांनी पीपीई किट घालून हाॅस्पिटलमध्ये आत जाऊन खरी माहिती घ्यायाबाबत अजय मेहता यांनी आकडेवारी घोळ दुरूस्त करण्यासाठी चार-चार दिवस लागत असेल तर खूपच गंभीर गोष्ट आहे. उद्या तातडीने दोन आयएएस अधिकाऱ्यांनी स्वत: पीपीए किट घालून आकडेवारीतल घोळ दूर झाल्याशिवाय किती बेडस् लागणार हे सांगणे देखील कठीण असल्याचे मेहता यांनी सांगितले. ------ग्रामीण भागातील झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्या चिंतेचा विषयग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसात ज्या झपाट्याने रुग्ण वाढले ती अत्यंत गंभीर बाब असल्याचे राज्य आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील रुग्ण संख्या वाढीचा वेग वेळीच नाही रोखला तर रुग्ण संख्या हाताबाहेर जाईल. -----

मुंबईने केले, मग पुण्याला का करता आले नाहीपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे उदाहरण देऊन पुण्याला हे का शक्य नाही असा सवाल केला. ते म्हणाले, टेस्ट, ट्रेसींग, ट्रिटमेंट, बेड मॅनेजमेंट यातून मुंबईची परिस्थिती सुधारली. आम्ही अगदी साध्या व्हॅनचेही रुग्णवाहिकेत रुपांत केले. प्रयोगशाळांचे अहवाल महापालिकेकडेच आले पाहिजेत. तरच नियोजन करणे शक्य होते.--'

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारAaditya Thackerayआदित्य ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल