शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

corona virus : कचरा वेचणाऱ्या महिलेचं दातृत्व महान,कोरोनाच्या लढाईसाठी १५ हजार रुपये दान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 12:56 IST

महिन्याला अवघे पाच ते सहा हजार रुपये मिळतात. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही...

ठळक मुद्देगृहमंत्री अनिल देशमुख यांनी विश्रांतवाडी येथील स्वच्छता सेवक मावशींचे मानले आभार

पुणे : कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीवर मात करण्यासाठी समाजातील विविध स्तरातून अनेकजण मदतीचे हात पुढे करत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पीएम केअर्स फंडमध्ये मदत दिली. परंतु पुण्यातील एका कचरा वेचणाऱ्या महिलेचं दातृत्व सगळ्यांसमोर सरस ठरेल असंच आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या महिलेने त्यांनी 15 हजार रुपयांची मदत केली आहे.गवळणबाई मुरलीधर उजगरे असे त्या महिलेचे नाव आहे.  या गेल्या 20 वर्षांपासून कचरा गोळा करतात. यावरच त्यांचा चरितार्थ चालतो. महिन्याला अवघे पाच ते सहा हजार रुपये मिळतात. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही. आतापर्यंत साठवलेले सगळे पैसे त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी देऊन टाकले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कराळेकर व छावाप्रमुख धनंजय जाधव यांच्या माध्यमातून Online मुख्यमंत्री फंडात ५००० रुपये आणि माता जिजाऊ प्रतिष्ठान ५००० रुपये जीवनज्योती प्रतिष्ठान ५००० रुपये दोन सेवाभावी संस्थांना एकूण 15 हजार रुपयांची मदत त्यांनी केली आहे.

जाधव यांनी उजगरे यांचे पैसे आँनलाइन पाठविण्यासाठी मदत केली. "माझं वय साठ वर्षांच्या वर आहे. पण असं संकट कधी पाहिलं नव्हतं," असं त्या म्हणाल्या. यावेळी देशासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. -----------------------------------जगलो तर अजून कमवता येईल....

"आपण जगलो तर पुढे अजून कमावता येईल, पण आता लोकांना मदत होणं गरजेचं आहे," असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या या संकटातही त्या कचरा वेचण्याचं काम करतच आहेत. "धोका आहे म्हणून जर सगळेच घरात बसले तर कम कसं होणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला.--------------------------------------गृहमंत्री देशमुख यांनी मानले आभार गवळणबाई उजगरे विश्रांतवाडी / धानोरी भागातील भीमनगरमधल्या झोपडपट्टीत राहतात. अशा परिस्थितीमध्येही त्यांचं धैर्य आणि इच्छाशक्ती कमी झालेली नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विश्रांतवाडी येथील स्वच्छता सेवक मावशींचे Twitte करून आभार मानले आहेत.--------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChief Ministerमुख्यमंत्रीonlineऑनलाइनfundsनिधीAnil Deshmukhअनिल देशमुख