Corona virus : खळबळजनक ! राजगुरूनगरमध्ये वयोवृद्ध कोरोना रुग्णाची हाताची नस कापून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:26 IST2020-08-08T13:25:59+5:302020-08-08T13:26:36+5:30
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Corona virus : खळबळजनक ! राजगुरूनगरमध्ये वयोवृद्ध कोरोना रुग्णाची हाताची नस कापून आत्महत्या
राजगुरुनगर: कोरोना बाधित असलेल्या जेष्ठ नागरिकांनी हाताची नस कापुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर शहरात घडली.दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर ( वय ६० ) असे या व्यक्तीचे नाव आहे..
शहरातील बाजारपेठ परिसरात राहणारे मयत जुन्नरकर व त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात १५ दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते.मात्र दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती असे सांगितले जात आहे. रुग्णालयात अवास्तव खर्च झाल्यावर आणि एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते.मात्र त्रास तीव्रतेने जाणवत होता असे समजते. शुक्रवारी (दि ७) पुन्हा स्वब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज येणार होता. त्यांना त्रास होत असल्याने घरी डॉक्टर जाण्यास तयार नव्हते.त्रास कमी होत नसल्याने या जुन्नरकर यांनी शुक्रवारी झोपल्यावर त्याच खोलीत हाताची नस धारदार सुरीने कापून रात्री आत्महत्या केली. शनिवारी ( दि ८) सकाळी मुलगा त्यांना उठवायला गेल्यावर जुन्नरकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले.बाजारपेठ परिसरात व शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत