शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : 'होम आयसोलेशन’ झालेल्यांमुळेच शहरात वाढताहेत कोरोनाबाधित? रुग्ण बिनधास्त, महापालिका यंत्रणा मात्र हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 14:40 IST

होम आयसोलेशन’ झालेल्यांचा समाजजीवनातील सर्रास वावर ठरतोय सध्या डोकेदुखी..

ठळक मुद्देना हातावर शिक्का, ना घराच्या दारावर होम आयसोलेशेन झालेल्या व्यक्तींची नावे‘होम आयसोलेशन’ झालेल्या पण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा विचार 

पुणे : कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत पण पॉझिटिव्ह आहेत, असे शेकडो कोरोनाबाधित रूग्ण तपासणीअंती ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्विकारत आहेत. पण ‘होम आयसोलेशन’ झालेले हेच कोरोनाबाधित सध्या कोरोनाचा संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच ‘होम आयसोलेशन’ झालेल्यांवर महापालिकेचे कुठलेच नियंत्रण किंबहुना नियंत्रण ठेवता येत नसल्याने, त्यांचा समाजजीवनातील सर्रास वावर हा सध्या डोकेदुखी ठरला आहे.     पुणे महापालिका हद्दीत आजमितीला साधारणत: सात हजार कोरोनाबाधित रूग्णांनी ‘होम आयसोलेशन’ होऊन घरीच औषधोपचार घेण्याचा पर्याय स्विकारला आहे. पण हा पर्याय स्विकारणारे रूग्ण दोन-तीन दिवस घरात राहतात व त्यानंतर…..... ना हातावर शिक्का, ना घराच्या दारावर होम आयसोलेशेन झालेल्या व्यक्तींची नावे     एकीकडे महापालिका कोविड केअर सेंटर बंद करून, लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना १४ दिवस घरात राहून औषोधोपचार घेण्याचा पर्याय देत आहे़ हा पर्याय देताना पूर्वी महापालिकेकडून संबंधित रूग्णाच्या हातावर ‘होम आयसोलेशन’ शिक्का मारला जात असे़ या शिक्क्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला जी शाई दिली जाई ती महिनाभर तरी हातावरून पुसली जात नव्हती. पण आत्ता जी शाई पालिकेकडे उपलब्ध आहे, त्याव्दारे शिक्का मारला तर तर अवघ्या एका दिवसात ती पुसली जाते. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी वर्गानेही आता हातावर शिक्का मारणे बंद केले असून, केवळ संबंधित रूग्णाकडून ‘मी चौदा दिवस घरात राहील, बाहेर फिरणार नाही तथा पालिकेकडून फोनव्दारे देण्यात येणाऱ्या सूचनांनुसार औषधोपचार घेऊन नित्याने प्रकृतीची खरी माहिती देईल’ अशा आशयाचे हमीपत्र लिहून घेतले जाते.     या हमीपत्रावर घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांचा जो पत्ता असतो तो गृहित धरण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. व त्या व्यक्तीची माहिती क्षेत्रिय कार्यालयांकडे त्याच्या फोन नंबरसह दिली जाते. पण सद्यस्थिताला त्या व्यक्तीच्या राहत्या घराच्या दारावर ‘होम आयसोलेशन’ झालेल्या व्यक्तींचे नाव, कालावधी याची संपूर्ण माहिती असलेले स्टिकर्सही की जे पूर्वी लावले जात होते ते आता लावले जात नाही. त्यामुळे सोसायटीत, वस्तीत किंवा परिसरातील इतरांना संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे हे कळतही नाही.परिणामी ना हातावर शिक्का, ना घराच्या दारावर होम आयसोलेशेनचे पोस्टर्स यामुळे संबंधित पॉझिटिव्ह व्यक्ती बिनधास्तपणे समाजात वावरत असून, त्यांच्यावर कोणाचेच निर्बंध उरलेले नाहीत.----------------------------------महापालिका यंत्रणाही हतबल      ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारून घरी गेलेली व्यक्ती घरी गेल्यावर दोन-तीन दिवसानंतर सर्रास पणे घराबाहेर फिरू लागल्या आहेत़ ज्या कोरोनाबाधित व्यक्ती घरी उपचार घेत आहेत, ते वॉर्ड ऑफिसस्तरावरून गेलेले फोन उचलत नाहीत. जे संपर्क क्रमांक दिले आहेत ते चुकीचे आहेत़ तर अनेक जणांनी पाठपुरव्यासाठी यंत्रणेकडून जाणारा फोन क्रमांकच ब्लॉक करून ठेवला आहे. अशा तक्रारी प्रत्यक्ष फिल्डवर अथवा ‘होम आयसोलेशन’ झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना औषोधोपचारासाठी मार्गदर्शन करणाºया यंत्रणेने केल्या आहेत.     शहरात दररोज दीड ते दोन हजार कोरोनाबाधित रूग्ण वाढत असून, यापैकी ६० टक्क्यांहून अधिक रूग्ण ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्विकारत आहेत़ परंतु, हमीपत्र भरून देताना दिलेली माहिती अनेकदा खोटी असते तर पत्ताही एक व राहतात दुसरीकडे अशी परिस्थिती अनेक घटनांमध्ये दिसून आली आहे़ अशा परिस्थितीत महापालिका यंत्रणाही हतबल झाली आहे़     --------------------‘होम आयसोलेशन’ झालेल्या पण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा विचार     ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारून १४ दिवस घरात राहणाऱ्या व्यक्ती घराबाहेर पडताना दिसत आहे.त्यामुळे वॉर्ड स्तरावर काम करणाऱ्या यंत्रणा ‘होम आयसोलेशन’ पर्याय स्विकारूनही जर संबंधित व्यक्ती घराबाहेर पडली तर तिच्यावर थेट पोलिस कारवाई करावी यासाठी मागणी केली आहे. याबाबत महापालिकेची आरोग्य यंत्रणेने पोलिस दलातील वरिष्ठांशी बोलून, प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीत ‘होम आयसोलेशन’ झालेल्या व्यक्तींची यादी सूपूर्त करावी व घराबाहेर पडणाऱ्या कोरोनाबाधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी वॉर्डस्तरावरून होत आहे.---------------------स्वॅब दिल्यावर अनेकांकडून पोबारा     महापालिकेच्या विविध कोरोना चाचणी केंद्रांवर स्वॅब दिल्यावर, लक्षणे असलेल्या संबंधित व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये थांबावे असे यंत्रणेकडून सांगितले जाते. मात्र काही जण स्वॅब दिल्यावर त्या हॉस्पिटलमधून पळून जातात़ अशा घटनाही शहरात वारंवार घडत आहेत.     दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कॉन्टक्ट ट्रेसिंग प्रक्रियेतून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येते. परंतु यातील अनेक जण आपली चाचणी पॉझिटिव्ह येईल म्हणून पालिकेच्या सूचनेनुसार चाचणीसाठी जातच नाहीत. तसेच कित्येक जण स्वॅब दिल्यावर चाचणी अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन होण्याऐवजी बिनधास्तपणे सर्वत्र फिरत राहतात. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौर