शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
11
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
12
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
13
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
14
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
15
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
16
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
17
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
18
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
19
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
20
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

Corona virus : संतापजनक ! बेडसाठी आठ तास टाहो फोडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 01:02 IST

बुधवारी घडलेल्या या गंभीर घटनेने आरोग्य व प्रशासन यंत्रणांचा दाव्याचा फुगा फुटला आहे.

ठळक मुद्देया कोरोनाबाधित रुग्णाचा बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : उपचारांसाठी शहरात आठ तास बेड उपलब्ध होत नसल्याने आंदोलन कराव्या लागलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू झाला. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाच्या दाव्यांचा फुगा या घटनेमुळे फुटला आहे. 

धायरी परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घरीच औषधोपचार घेत होता. मंगळवारी दुपारी त्याला श्वासनाचा त्रास झाला. त्याच्या कुटुंबियाांनी ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करून रुग्णालय शोधायला सुरुवात केली. दुपारी दोन वाजता सिंहगड रस्त्यावर सुरू झालेला त्यांचा प्रयत्न सर्व बड्या रुग्णालयातून फिरून संपला. रात्री आठपर्यंत त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. संतापलेल्या नातेबाईकांनी रुग्णवाहिका घेऊन थेट टिळक चौकातील छत्रपती संभाजी महाराज पोलीस चौकीच्या समोरच रस्त्यावर ठाण मांडले. 

रुग्णवाहिकेमधील ऑक्‍सिजनही केवळ २० टक्केच शिल्लक होता. पोलिसांनी स्वयंसेवी संस्था, पत्रकार, महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडी येथे एका खासगी रूग्णालयात बेड मिळाल्यावर तेथे उओचार सुरू करण्यात आले. बुधवारी दुपारी उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेचा तकलादूपणा पुन्हा एकदा समोर आला असून सर्वसामान्यांना बडी रुग्णालये दाद देत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यAjit Pawarअजित पवारMayorमहापौर