Corona Virus : शिरूर येथील रहिवाशी शाळेत ४८ मुली आणि ९ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:50 PM2021-04-28T20:50:28+5:302021-04-28T20:50:42+5:30

प्रशासन खडबडून जागे; आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांकडून शाळेची पाहणी....

Corona Virus : 48 girls and 9 teachers corona positive in resident school at shirur | Corona Virus : शिरूर येथील रहिवाशी शाळेत ४८ मुली आणि ९ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ

Corona Virus : शिरूर येथील रहिवाशी शाळेत ४८ मुली आणि ९ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ

Next

शिरुर : पुणे शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे.जिल्हा प्रशासनाकडून अनेक स्तरावर कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तरीदेखील ग्रामीण भागात नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे गांभीर्याने पालन होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. मात्र, याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शिरूर शहरालगत असणाऱ्या एका रहिवाशी मुलींच्या शाळेतील ४८ मुली व नऊ शिक्षक अशा एकूण ५७ जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली आहे.
 
याबाबत शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, शिरूर शहरालगत असणाऱ्या या शाळेमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती नगरपरिषदेला समजली. या समजलेल्या माहितीनुसार तो रुग्ण आढळल्याने या शाळेतील मुलींची ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातुन अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना झालेल्या मुलींनां शाळेतील एक शिक्षक बाहेर गावाहुन येत असल्याने प्रार्दुभाव झाल्याची माहिती समजली आहे.

शिरूर येथील निवासी शाळेतील मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची व शिक्षकांची शासकीय रुग्णालयामार्फत तपासणी करून औषध उपचार सुरु करण्यात आले आहे. तसेच एका त्रास होत असलेल्या मुलींवर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत .तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवण्याची व्यवस्था केली. शाळेच्या परिसरात नगरपरिषदेच्या वतीने फवारणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली.
......

निवासी शाळेतील सर्व मुली व स्टाफ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी एकाची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असून आहे. इतरांना त्या शाळेत क्वारंटाईन केले असून गोळ्या औषधे देणे देण्याचे काम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.तुषार पाटील यांनी सांगितले .

Web Title: Corona Virus : 48 girls and 9 teachers corona positive in resident school at shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.