Corona virus : पुणे शहरात शनिवारी ३८९ नवीन कोरोना बाधित, एकूण रुग्णसंख्या ११हजार ८५४ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 22:32 IST2020-06-20T22:31:54+5:302020-06-20T22:32:25+5:30
शहरात विविध रुग्णातील उपचार घेत असलेले २७३रुग्ण अत्यवस्थ..

Corona virus : पुणे शहरात शनिवारी ३८९ नवीन कोरोना बाधित, एकूण रुग्णसंख्या ११हजार ८५४ वर
शहरातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचा आकडा ५०० पार
दिवसभरात ३८९ ची वाढ : एकूण २७३ रुग्ण अत्यवस्थ, १८३ झाले बरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचा आकडा ५०४ वर पोचला असून दिवसभराय रुग्णसंख्येत ३८९ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ११ हजार ८५४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १८३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार २६४ झाली आहे. विविध रुग्णालयातील २७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ४ हजार ८६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शनिवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ३८९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २१६ तर खासगी रुग्णालयांमध्ये १६८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात शनिवारी ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५०४ झाली आहे. दिवसभरात एकूण १८३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४६ रुग्ण, ससूनमधील ०५ तर खासगी रुग्णालयांमधील ३२ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार २६४ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ हजार ८६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ६८४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८६ हजार ८७१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ७८९, ससून रुग्णालयात १०९ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १ हजार १८८ रुग्ण उपचार घेत आहेत.