Corona virus: 321 new corona affected patients in pune on friday; 24 person died | Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी ३२१ कोरोनाबाधितांची वाढ; २४ जणांचा बळी

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी ३२१ कोरोनाबाधितांची वाढ; २४ जणांचा बळी

पुणे : शहरात शुक्रवारी केवळ ३२१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ७३० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यामध्ये ४ जण पुण्याबाहेरील आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत दिवसभरात शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ६८४ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ३६४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार ८३० जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. 

पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख १६ हजार ९८६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ५९ हजार ७७ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ४७ हजार ६४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ७ हजार ३४९ इतकी आहे़ तर आत्तापर्यंत ४ हजार ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus: 321 new corona affected patients in pune on friday; 24 person died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.