शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : पुणे जिल्हयात सहा कुटुंबातील २३ रुग्ण कोरोनाबाधित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 11:30 IST

सध्याची रुग्णांची स्थिती पाहता बाधित व्यक्तीने आपल्या कुटुंबालाच अधिक संक्रमित केल्याचे दिसते...

ठळक मुद्देकोरोना सदृश लक्षणे असल्यास स्वत:ला कुटुंबातील अन्य सदस्यांपासून विलग ठेवणे आवश्यक

राजानंद मोरे-  पुणे : कोरोना विषाणूची लागणझालेल्या एकूण रुग्णांपैकी जवळपास निम्मे म्हणजे २३ रुग्ण सहा कुटुंबातीलच आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा फुगलेला दिसत आहेत. सध्याची रुग्णांची स्थितीपाहता बाधित व्यक्तीने आपल्या कुटुंबालाच अधिक संक्रमित केल्याचे दिसते. त्यामुळे कोरोना सदृश लक्षणे असल्यास नागरिकांनी स्वत:ला कुटुंबातील अन्य सदस्यांपासून विलग ठेवणे आवश्यक आहे. तसेच विलंबन करता तातडीने डॉक्टरचा सल्ला घ्यावा, अन्यथा आपले कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात अडकू शकते,असे आवाहन तज्ञांनी केले आहे. पुणे जिल्ह्यात सोमवार (दि. ३१)पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ वर पोहचली आहे. त्यापैकी १४ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी रात्रीपर्यंत पुणे शहरात नायडूरुग्णालयामध्ये १९ तर खासगी रुग्णालयामध्ये ५ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यातील पहिला कोरोनागस्त रुग्ण नायडू रुग्णालयात आढळून आला. त्याचे कुटुंब दुबईवरून पुण्यात आले होते . त्यातील पती-पत्नीसह मुलीला कोरोनाची लागण झाली. तर त ज्याकॅबमधून मुंबईतून पुण्याला आले. त्या कॅब चालकालाही संसर्ग झाला. आता ते चौघे ही बरे झाले आहेत. त्याने तर त्यानंतर धनकवडी येथील एकाखासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलल्या ४० वर्षीय महिलेला लागण झाल्याचे समोर आले. त्याने तर याच ंमहिलच्या कुटुंबातील पाच जणांना विषाणूने विळखा घातल्याचे स्पष्ट झाले.त्यामध्ये तिचा पती,  मुलगा, बहीण, तिचा पती व मुलगी यांचा समावेश आहे. कर्वे रस्त्यावरील खासगी रुग्णालयातील कोरोनागस्त रुग्णाच्या कुटुंबातीलही पाच जण कोरोनाबाधित झाल आहेत. त्यामध्ये त्याचे आई-वडील, पत्नी, भाऊ व त्याची पत्नी यांचा समावेश आहे. या दोन कुटुंबातीलच १२ जण उपचार घेत आहेत. मुकूंदनगर भागातील झोपडपट्टीतील दुबईला गेलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या मलीलाही बाधा झाली. तर बर्म्युडा येथून आलेल्या पतीला कोरोनाची बाधा झाल्यानतर त्याच्या पत्नीलाही विळखा पडला. पिंपरी चिचवड मधील एकूण १२ जणांपैकी चार जण ह एकाच कुटुंबातील आहेत. त्यापकी एक जण दुबईवरून आले होते. ते बाधित असल्याने इतर तीन जणांना संसर्ग झाला. जिल्ह्याचा सोमवारपर्यंतचा आकडा ४४ वर गेलेला असताना त्यातील निम्मे रुग्णे सहा कुटुंबातील आहेत...........कोरोना विषाणची लागण झालेले  रुग्ण पहिल्यांदा आपल्या कुटुंबालाच संक्रमित करत असल्याचे रुग्णांच्या स्थितीवरून दिसते. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसले तरी स्वत:ला विलग करणे आणि वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याला विलंब झाल्यास आपल्या कुटुंबाला पहिला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ही दक्षता घ्यायला हवी.- डा. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.............

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFamilyपरिवारHomeघरdoctorडॉक्टर