Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार ५४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन गेले घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:33 PM2020-07-29T22:33:48+5:302020-07-29T22:35:29+5:30

शहरात बुधवारी १ हजार ३०८ रुग्णांची झाली वाढ

Corona virus: 2 thousand 543 corona free patients going from home in Pune city on Wednesday | Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार ५४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन गेले घरी

Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार ५४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन गेले घरी

googlenewsNext
ठळक मुद्देआत्तापर्यंत ३२ हजार ६२३ जण झाले कोरोनामुक्त

पुणे : पुणे शहरात बुधवारी सर्वाधिक कोरोनाबधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात २ हजार ५४३ जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ३२ हजार ६२३ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
            पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज नव्याने १ हजार ३०८ नव्या कोरोना बधितांची वाढ झाली आहे. आजपर्यंत शहरात एकूण ५१ हजार ७३८ जणांना कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव रूग्ण संख्या ही १७ हजार ८६१ इतकी आहे़. दरम्यान आज दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू असून, या रूग्णांपैकी ७ रूग्ण हे शहराबाहेरील आहेत. शहरात आजपर्यंत १ हजार २५४ रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. 
        शहरातील विविध रुग्णालयातील ८४५ रुग्ण अत्यवस्थ असून, ४३२ जण व्हेंटिलेटरवर आहेत.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर तब्बल ५  हजार ९१९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २ लाख ६१ हजार जणांची तपासणी करण्यात आली आहे.
--------

Web Title: Corona virus: 2 thousand 543 corona free patients going from home in Pune city on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.