Corona virus: 1,440 corona infections increase in Pune on Thursday; 1,196 patients recover | Corona virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ४४० कोरोनाबाधितांची वाढ ;११९६ रुग्ण झाले ठणठणीत बरे

Corona virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ४४० कोरोनाबाधितांची वाढ ;११९६ रुग्ण झाले ठणठणीत बरे

ठळक मुद्देआजपर्यंत शहरात ६२ हजार ६७ जण कोरोनाबाधित असले तरी अ‍ॅक्टिव्ह १६ हजार ९७५

पुणे शहरात गुरूवारी १ हजार ४४० कोरोनाबाधितांची वाढ ;१ हजार १९६ झाले ठणठणीत बरे   

पुणे :पुणे शहरात गुरूवारी १ हजार ४४० कोरोनाबधितांची वाढ झाली असून, १ हजार १९६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ दिवसभरात ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी ५ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत. 

        पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ६६४ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते यापैकी ४२५जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर २ हजार २२७ रुग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. 

आजपर्यंत शहरात एकूण ६२ हजार ६७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १६ हजार ९७५ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ४३ हजार ६०६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ४५६ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.        

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर  ५ हजार २०८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख २ हजार ९४५ वर गेला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus: 1,440 corona infections increase in Pune on Thursday; 1,196 patients recover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.