Corona Vaccine: पुणे महापालिकेच्या ६८ केंद्रांवर लस उपलब्ध, ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ६२ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 00:43 IST2021-07-11T23:13:25+5:302021-07-12T00:43:21+5:30
Corona Vaccination in Pune: पुणे महापालिकेच्या एकूण ६८ केंद्रांवर सोमवारी लसीकरण केले जाणार आहे. ६२ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे.

Corona Vaccine: पुणे महापालिकेच्या ६८ केंद्रांवर लस उपलब्ध, ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ६२ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध
पुणे : महापालिकेच्या एकूण ६८ केंद्रांवर सोमवारी लसीकरण केले जाणार आहे. ६२ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार असून या केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ६२ लसीकरण केंद्रावर उपलब्ध कोव्हीशिल्ड लसींच्या साठ्यापैकी ४० टक्के लस आॅनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत. तर, २० टक्के ऑन द स्पॉट दिल्या जाणार आहेत. यासोबतच २० टक्के लस १८ एप्रिल पूर्वी पहिला डोस घेतलेल्या आणि ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहेत. तर, २० टक्के लस जागेवर देण्यात येणार आहेत.
१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना सहा केंद्रांवर कोव्हक्सीन लस दिली जाणार आहे. यातील २० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या तर २० टक्के लस ऑन द स्पॉट बुकिंग करून दिली जाणार आहे. यातील ४० टक्के लस १३ जुनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे तर २० टक्के लस ऑन द स्पॉट दिली जाणार आहे.