Corona Vaccine : पुणे शहरात मंगळवारी १८१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध; ३० ते ४४ वयोगटातील १५ केंद्रांवर लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 23:19 IST2021-06-21T23:19:10+5:302021-06-21T23:19:53+5:30
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय एका केंद्रावर ३० ते ४४ वयोगटाकरिता लस उपलब्ध राहणार आहे.

Corona Vaccine : पुणे शहरात मंगळवारी १८१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध; ३० ते ४४ वयोगटातील १५ केंद्रांवर लसीकरण
पुणे : शहरातील महापालिकेच्या १८१ केंद्रांवर आज ( मंगळवार दि. २२ जून) कोविशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. दरम्यान आजही प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय एका केंद्रावर ३० ते ४४ वयोगटाकरिता लस उपलब्ध राहणार आहे.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. याव्दारे ३० मार्च पूर्वी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला आहे त्यांना २० टक्के लस व ३० टक्के लस या पहिला डोस म्हणून नोंदणी करता येणार आहे. तर २० टक्के लस दुसरा डोस करीता व ३० टक्के लस या पहिला डोस म्हणून ऑन द स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे.
----
२४ मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
ज्या नागरिकांनी २४ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.
------------------------