Corona Vaccination : शहरात मंगळवारी महापालिकेच्या ५६ केंद्रांवर कोविशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 21:31 IST2021-06-14T21:30:09+5:302021-06-14T21:31:26+5:30
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़.

Corona Vaccination : शहरात मंगळवारी महापालिकेच्या ५६ केंद्रांवर कोविशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन उपलब्ध
पुणे : राज्य शासनाकडून नव्याने लसीचा पुरवठा न झाल्याने, आज (मंगळवार दि़१५ जून) महापालिके च्या केवळ ५६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या १०० डोस पैकी ४० टक्के कोविशिल्ड लस व ६० टक्के कोव्हॅक्सिन लस या ऑनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहे.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़ कोविशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ४० टक्के लस ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (२३ मार्च पूर्वी ) पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस म्हणून दिली जाणार आहे़ तसेच उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना ऑन द स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे.
-----
१७ मे पूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
ज्या नागरिकांनी १७ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १६ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑनस्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.
------------------------