Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 14:00 IST2021-05-01T13:59:44+5:302021-05-01T14:00:34+5:30
पुणे शहरासाठी सात दिवसांसाठी फक्त ७ हजार लसी..?

Corona Vaccination Pune : ...तर मग लसीकरण सुरुच का केलं? महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल
पुणे: पुणे शहरासाठी सात दिवसांसाठी फक्त ५००० लसी देण्यात आल्या असुन या पुरवायच्या कशा असा प्रश्न महापालिकेसमोर असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणले आहे. जर ही परिस्थिती असणार होती तर लसीकरण सुरु का केलं गेलं असा सवाल आता विचारला जात आहे.
आज अनेक केंद्रावर लसीकरणालाठी गर्दी पहायला मिळाली. यामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांप्रमाणे नोंदणी न केलेले नागरिक देखील होते. शहरात असे एकुण नागरिक जवळपास २० लाखांच्या आसपास आहेत. पण लसींचा अतिशय तोकडा पुरवठा झाल्याने लसीकरण करायचं करी कसं असा प्रश्न आता महापालिकेला पडला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले “ दोन केंद्रावर दिवसाकाठी ७०० लसी वापरल्या जातील असं लक्षात आल्याने आम्ही नागरिकांनी गर्दी करु नये असं जाहीर केलं होतं. तरीदेखिल अनेक नागरिकांनी गर्दी केली. सरकार कडुन १८-४४ वयोगटासाठी फक्त ५००० लसी पुरवल्या गेल्या आहेत. या लसी ७?दिवस पुरवायला सांगितल्या आहेत. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात हे लसीकरण होणार आहे. नागरिकांनी नोंदणी केली नसेल तर गर्दी करु नये अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत”