Corona Vaccination : पुणेकरांना बुधवारीही कोव्हॅक्सिन लसच मिळणार ; मंगळवारी १६ हजार ३८० जणांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 22:26 IST2021-06-01T22:25:25+5:302021-06-01T22:26:30+5:30
पुणे शहरातील १५ केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत.

Corona Vaccination : पुणेकरांना बुधवारीही कोव्हॅक्सिन लसच मिळणार ; मंगळवारी १६ हजार ३८० जणांचे लसीकरण
पुणे : शहरातील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ५ मे पूर्वी घेतला आहे, अशा नागरिकांना बुधवारी(दि.२) १५ केंद्रांवर केवळ दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.
शहरातील प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय महापालिकेच्या एका केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस वितरित करण्यात आले आहेत. लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग केलेल्यांना तर ४० टक्के लस ही ऑन स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणी सकाळी आठ वाजता खुली होणार आहे.
दरम्यान मंगळवारीही महापालिकेकडे राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने, आजही शहरातील कुठल्याच महापालिकेच्या केंद्रावर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.
-----------------------
मंगळवारी दिवसभरात १६ हजार ३८० जणांचे लसीकरण
एकीकडे कोविशिल्ड लसीअभावी महापालिकेची शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद असताना, शहरातील खासगी रूग्णालयांमध्ये मात्र कोविशिल्ड लसीसह कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे.यामुळे मंगळवारी दिवसभरात शहरात १६ हजार ३८० जणांना लस घेता आली आहे. यामध्ये सर्वाधिक लसीकरण हे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे झाले असून, ही संख्या १४ हजार ८७५ इतकी आहे.