Corona Update: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 06:00 PM2022-01-08T18:00:06+5:302022-01-08T18:03:42+5:30

पुण्यात आजही दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे निदान...

corona update pune diagnosis of more than 2 thousand corona cases in pune third day in a row | Corona Update: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे निदान

Corona Update: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचे निदान

Next

पुणे: Corona Update in Pune City: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाचे (covid 19 cases update pune) रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. शनिवारी शहरात कोरोनाच्या २ हजार ४७१ रुग्णांचे निदान झाले आहे. शुक्रवारच्या तुलनेत शहरातील प्रतिदिन रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली आहे. शहरात शुक्रवारी २ हजार ७५७ रुग्ण आढळले होते. तर आज शहरातील ७११ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोनामुळे पुणे शहरातील दोन तर पुण्याबाहेरील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

शहरातील आतापर्यंतची पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५ लाख २२ हजार ६ वर गेली आहे. सध्या शहरात ११ हजार ५५० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरात १९ हजार १८६ कोरोनाच्या चाचण्या केल्या होत्या त्यामध्ये २ हजार ४७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील आजचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी होऊन तो ६.०६ टक्क्यांपर्यंत आला आहे.

Web Title: corona update pune diagnosis of more than 2 thousand corona cases in pune third day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.