Corona Update: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 19:54 IST2022-01-07T19:51:58+5:302022-01-07T19:54:20+5:30

शुक्रवारी पुण्यात ६२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे

corona update in pune cityr record growth of corona patients in the city | Corona Update: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

Corona Update: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

पुणे: Corona Update in Pune City:पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज (शुक्रवार, ७ जानेवारी) पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २ हजार ७५७ रुग्ण आढळले आहेत. एक आठवड्यांपुर्वी प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ २०० च्या जवळपास होती. जी आज २ हजार ७५७ पर्यंत पोहचली आहे. आज दिवसभरात १८ हजार ८६ जणांनी कोरोनाची चाचणी केली होती. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ७.७१ वर आला आहे. 

शुक्रवारी पुण्यात ६२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १२४ वर गेली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील कॉलेजेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत.

Web Title: corona update in pune cityr record growth of corona patients in the city