शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भिगवण परिसरातील 'त्या' रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १८ जणांची कोरोना तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 19:44 IST

इंदापुर तालुक्यातील भिगवण परिसरात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.

ठळक मुद्देरुग्णाच्या संपर्कातील एकुण ३२ जण क्वारंटाईन परिसरात पुढील तीन दिवस काटेकोर बंद पाळला जाणारदवाखाना आणि मेडिकल वगळता सर्व व्यवसाय काटेकोरपणे बंद ठेवण्यात येणार

भिगवण: इंदापुर तालुक्यातील  भिगवण स्टेशन येथील कोरोना लागण झालेल्या रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १८ जणांच्या घशातील स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.यामध्ये कुटुंबातील चार जणांना औंध पुणे येथे कोरोना तपासणी नमुना घेण्यासाठी नेण्यात आले आहे .तर संपर्कात आलेल्या १४ जणांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये तपासणी करून कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला आहे.या सर्वांना तपासणी अहवाल येईपर्यंत हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.तसेच रुग्णाच्या संपर्कातील एकुण ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे,अशी माहिती भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. अमित उदावंत यांनी दिली .इंदापुर तालुक्यातील भिगवण परिसरात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.त्यामुळे ग्रामीण भागात मोठी खळबळ माजली आहे. भिगवण स्टेशन येथील ६५ वर्षाची ही महिला आहे. त्यांच्या मुलाने त्यांना उपचारासाठी नेल्याची माहिती मिळाल्याने मुलगा त्याची पत्नी आणि दोन मुलांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, मंगळवारी(दि. २८)  रात्री उशिरा त्यांना पुणे औंध येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले . तर त्यांच्यावर भिगवण येथे उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि पॅथॉलॉजीस्ट यांच्यासह १४ जणांना तपासणीसाठी बारामती येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे,अशी   माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भिगवण आणि भिगवण रेल्वे स्टेशन  परिसरातील तक्रारवाडी डीकसळ परिसर सील करण्यात आला आहे.तर शेती साठी शेतकरी यांना ११ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. एकदा शेतीत गेलेल्या शेतकºयानेसायंकाळी घरी येण्याची सूचना करण्यात आली आहे.तर भाजीपाला आणि किराणासाठी घरपोच सुविधा पुरविणाºया दुकानदारांची यादी जाहीर केली जाणार आहे. परिसरात पुढील तीन दिवस काटेकोर बंद पाळला जाणार असल्याची माहिती व्यापारी संघटना यांच्याकडून दिली गेली आहे . दवाखाना आणि मेडिकल वगळता सर्व व्यवसाय काटेकोरपने बंद ठेवण्यात येणार आहे .

टॅग्स :BhigwanभिगवणIndapurइंदापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर