Corona Positive news in Pune : पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी; पुण्यात कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण फक्त १९ टक्के 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:26 PM2020-08-18T16:26:59+5:302020-08-18T16:52:07+5:30

कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मुंबईला मागे टाकत पुणे जिल्हा राज्यातील १ नंबरचा हॉटस्पॉट बनला आहे.

Corona Positive news in Pune : Positive news for Punekars; Only 19% of coronavirus active patients in Pune | Corona Positive news in Pune : पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी; पुण्यात कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण फक्त १९ टक्के 

Corona Positive news in Pune : पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी; पुण्यात कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण फक्त १९ टक्के 

Next
ठळक मुद्देदहा दिवसांत सक्रिय रुग्ण ८ टक्क्यांनी घटले

पुणे : सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा वेग पुण्यामध्ये मुंबईपेक्षा जास्त आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्हा राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्येसह ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. दुसरीकडे, पुण्यातील सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) रुग्णांची टक्केवारी दहा दिवसांमध्ये ८ टक्क्यांनी घटली आहे. ७ ऑगस्ट रोजी कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण २७ टक्के होते. १७ ऑगस्ट रोजी हे प्रमाण १९ टक्कयांपर्यंत खाली आले. 

कोरोना विषाणूचे संकट अद्यापही कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. पुणे शहरात दररोज १००० ते १५०० एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, कमी मृत्यूदर आणि सक्रिय रुग्णांची कमी होत असलेली संख्या नागरिक आणि प्रशासनासाठी दिलासा देणारी ठरत आहे. पुणे महानगरपालिका आणि पुणे स्मार्ट सिटीकडून जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीनुसार, ७ ऑगस्ट रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १७,०३३ इतकी होती. १७ ऑगस्ट रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १४,४४२ इतकी आहे. सक्रिय रुग्णांची कमी होत असलेली संख्या काहीशी दिलासादायक ठरत आहे. त्याचप्रमाणे, गंभीर रुग्णांची संख्याही काही प्रमाणात कमी होत असून पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

नुकत्याच हाती आलेल्या सिरो सर्वेक्षणानुसार, ५१ टक्के पुणेकरांमध्ये कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. म्हणजेच, ५१ टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आणि कळलेही नाही. म्हणजेच लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच कोरोनाची लक्षणे दिसत नसतील तरी आपल्याला इतरांपासून आणि आपल्याकडून इतरांना कळत-नकळत संसर्ग होऊ नये, यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आणि हात वारंवार धुणे या त्रिसुत्रीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

------------------------------
(सोर्स : महानगरपालिका रिपोर्ट)
                                  ७ ऑगस्ट      १७ ऑगस्ट

एकूण रुग्ण                      ४४,७७४            ५८,७०६
सक्रिय रुग्ण                     १७,०३३            १४,४४२
गंभीर रुग्ण                       ७६५                 ७०३
ऑक्सिजनवरील रुग्ण     २४५५               २३२२

Web Title: Corona Positive news in Pune : Positive news for Punekars; Only 19% of coronavirus active patients in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.