एका मुलीचे कोरोनाने निधन; आता आईचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:55 PM2021-08-27T18:55:31+5:302021-08-27T18:55:38+5:30

मृत्यूला जबाबदार दोषीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी केली

Corona dies of a daughter; Now the mother dies of shock, a mountain of grief on the family | एका मुलीचे कोरोनाने निधन; आता आईचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

एका मुलीचे कोरोनाने निधन; आता आईचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Next
ठळक मुद्देपार्वतीबाई याच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत्या करत

येरवडा : महापालिकेच्या पथदिव्याचा विजेचा शॉक लागल्याने ज्येष्ठ नागरिक महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कतारवाडी,भारतनगर येथे शुक्रवारी दुपारी घडली. पार्वतीबाई हिरामण झेंडे (वय ७०) या ज्येष्ठ नागरिक महिलेचा या घटनेत दुर्दैवाने मृत्यू झाला असून सदर प्रकरणी जबाबदार दोषीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. या गंभीर अपघातानंतर देखील घटनास्थळी महापालिका विद्युत विभाग यांचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी यांनी भेट दिली नाही. तसेच स्थानिक नगरसेविका शीतल सावंत या संपर्क करण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र कोणताही प्रतिसाद दिला नाही.

पार्वतीबाई झेंडे यांना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या पथदिव्यातून अचानक विजेचा शॉक लागला. या घटनेत त्यांचा दुर्दैवाने उपचारापूर्वी जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन दिव्यांग मुली असा परिवार आहे. पार्वतीबाई याच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यातच मागील वर्षी एका मुलीचे कोरोनाने निधन झाले आहे.

आज अचानक घडलेल्या या अपघातामध्ये पार्वतीबाई यांचे देखील दुर्दैवाने निधन झाले. या गंभीर घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे संबंधित जबाबदार दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. स्थानिक नगरसेविका आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी विश्रांतवाडी पोलिसांना निवेदन दिले. 

Web Title: Corona dies of a daughter; Now the mother dies of shock, a mountain of grief on the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.