शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिकची कामे जमत नसूनही ठेकेदाराने पाठवले; पाण्याची मोटार दुरुस्त करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 10:02 IST

घरमालकाने सुद्धा कोणतीही खबरदारी न घेता मेन स्विच बंद न करता किरण याला मोटार दुरुस्त करायला लावली

पुणे : पाण्याची मोटार दुरुस्त करत असताना विजेचा धक्का लागल्याने बिगारी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना तालीम चौक घोरपडी परिसरात घडली. या प्रकरणी ठेकेदारासह घरमालकाविरोधात निष्काळजीपणा आणि हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मधुकर उघडे (३२, रा. भीमनगर, मुंढवा) असे मृत्यू झालेल्या बिगारी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी रसूल शेख (३५, रा. भीमनगर, मुंढवा) आणि कुणाल चंद्रकांत रंगदळ (४५, रा. घोरपडी गाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण याची पत्नी शीतल उघडे (२३) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, किरण उघडे हे रसूल शेख या ठेकेदाराकडे बिगारीची कामे करत होता. त्याला इलेक्ट्रिकच्या कामाबद्दल काहीही माहिती नव्हती. याची माहिती असूनही ठेकेदार शेख याने १७ मे रोजी किरणला कुणाल रंगदळ याच्या घरी काहीतरी काम असल्याचे सांगून पाठवले. रंगदळ याच्या घरी पाण्याच्या मोटारीच्या दुरुस्तीचे काम होते. मोटारीच्या दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने किरण याचा मृत्यू झाला.

किरण उघडे याला इलेक्ट्रिकची कामे जमत नसल्याचे ठेकेदार शेख याला माहिती होते. असे असूनही शेख याने किरणला ते काम करण्यासाठी रंगदळ याच्या घरी पाठवले. तसेच घरमालक रंगदळ यानेदेखील किरण याला इलेक्ट्रिकची कामे जमतात अथवा नाही याची कोणतीही शहानिशा केली नाही. तसेच कोणतीही खबरदारी न घेता मेन स्विच बंद न करता किरण याला मोटार दुरुस्त करायला लावली. त्यामुळे मोटार दुरुस्त करत असताना विजेचा धक्का बसून किरणचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी ठेकेदार आणि घरमालकाविरोधात निष्काळजीपणा आणि हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मांजरे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेEmployeeकर्मचारीelectricityवीजDeathमृत्यूWaterपाणीPoliceपोलिसGhorpadiघोरपडी