शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

'विहिरीतील पाण्यात दूषित घटक...' आयुक्त म्हणतात,'नाही'

By राजू हिंगे | Updated: January 24, 2025 13:14 IST

सर्वाधिक बाधित रुग्ण नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरी  परिसरातील आहेत

पुणे : शहरात गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)चे संशयित रुग्ण वाढल्याची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित भागाची पाहणी केली. पुणे महापालिका नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरीच्या काही भागांना विहिरीतून विनाप्रक्रिया केलेले पिण्याचे पाणी देत आहे.नांदेड व बारांगणे मळा येथील विहिरी आणि जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत असा प्राथमिक अहवाल आला आहे. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. नांदेड फाट्याजवळ असलेल्या विहिरीची महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या विघृत, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते.याबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, सिंहगड रस्ता, नांदेड परिसराची पाहणी केली. सर्वाधिक बाधित रुग्ण याच परिसरातील आहेत. येथील विहिरी व जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचे आदेश दिले आहेत.काही ठिकाणी जलवाहिन्यांशेजारी सांडपाणी साठत असल्याची तक्रार स्थानिकांची आहे. त्यामुळे येथे साचलेले पाणी काढून टाकून आवश्यक तेथे नव्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाची ८५ पथके या परिसरात सर्वेक्षण करत आहेत. फक्त ‘फिल्टर’ केलेले पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांनी सध्या पाणी उकळून थंड करून प्यावे, अशी सूचना केली आहे. नांदेड व बारांगणे मळा येथील विहिरीतील पाण्याच्या प्राथमिक अहवालात कुठलेही दूषित घटक आढळलेले नाहीत. सविस्तर अहवाल लवकरच प्राप्त होईल, असेही डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.विहिरीला संरक्षक जाळी बसविणारनांदेड गावातील विहिरीला सरंक्षक जाळी नाही. याकडे नागरिकांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर या विहिरीला तातडीने संरक्षक जाळी बसवून घेण्याच्या व नियमित पाणी तपासणी करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणीkhadakwasala-acखडकवासला