कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात; घटनेनंतर आगीत चौघांचा होरपळून जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 21:59 IST2023-10-16T21:58:42+5:302023-10-16T21:59:06+5:30
हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात; घटनेनंतर आगीत चौघांचा होरपळून जागीच मृत्यू
- कल्याणराव आवताडे
धायरी : मुंबई - बंगळुरू महामार्गावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला जोराची धडक दिली. या भीषण झालेल्या अपघातात ट्रकला आग लागली. यात चौघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. यात लहान मुलाचाही समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मक्याचा भुसा घेऊन साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. यात कंटेनर रस्त्यावरच उलटला. मात्र धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिन मध्ये बसलेले चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे : स्वामीनारायण मंदिराजवळ ट्रकला आग; तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/vIyooDNO8Y
— Lokmat (@lokmat) October 16, 2023
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्गावर अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा लांबवर लागल्या आहेत. पुणे महापालिका व पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून क्रेन च्या साहाय्याने वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.