शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

संपर्कप्रमुखांवर प्रश्नांचा भडीमार

By admin | Updated: February 25, 2015 00:36 IST

शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर शहर पदाधिकारी, नगरसेवक आणि माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी असंख्य वेगवेगळे प्रश्न,

पिंपरी : शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर शहर पदाधिकारी, नगरसेवक आणि माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी असंख्य वेगवेगळे प्रश्न, अडचणी आणि शंकांचा अक्षरश: भडीमार केला. त्यास समर्पक उत्तरे देत त्यांनी संवाद साधला. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणीच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी मेळावा झाला. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपुरता तो मर्यादित होता. डॉ. कोल्हे यांच्या हस्ते शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मेळाव्याची सुरुवात झाली. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला शहर संघटक सुलभा उबाळे, बाबासाहेब धुमाळ, शहर उपप्रमुख गजानन चिंचवडे, धनंजय आल्हाट, योगेश बाबर, सल्लागार मधुकर बाबर, महिला संघटक सुशीला पवार, नगरसेवक आदी उपस्थित होते. शहरप्रमुख आणि शहर उपप्रमुखपदाची निवड झाली आहे. इतर पदांची नियुक्ती कधी केली जाणार, सभासद नोंदणी अभियान कधी घेणार, पक्षाला समांतर असलेल्या अनधिकृत संघटनांवर काय कारवाई करणार, महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी काय योजना आहे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीसंदर्भात नियोजन कधी करणार, पक्षाच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करावा, पक्षाबरोबरच विविध आघाड्यांची बांधणी कधी करणार आदी प्रश्नांसह विविध अडचणी, शंका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचारल्या. त्यावर कोल्हे यांनी समर्पक उत्तरे देत समाधान करण्याचा प्रयत्न केला.अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकर रद्द करणे या संदर्भात आकुर्डीत नुकताच संघर्ष मेळावा झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले होते, असे कोल्हे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)