शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टेमघर धरण बांधताना भेगा बुजविण्याचे कामच नव्हते झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 21:26 IST

साधारणपणे दगडी बांधकाम आणि सीमेंट कॉँक्रीटचा वापर करुन बांधलेल्या धरणांचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले जाते. टेमघर धरणाचे आयुष्य अवघ्या एकोणीस वर्षांचे... त्यातही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास २०१०-११ साली सुरुवात झाली.

ठळक मुद्देअवघ्या दहा वर्षांत आली गंभीर गळतीची वेळटेमघर धरण बांधताना भेगा बुजविण्याचे कामच नव्हते झाले 

पुणे : साधारणपणे दगडी बांधकाम आणि सीमेंट कॉँक्रीटचा वापर करुन बांधलेल्या धरणांचे आयुष्य शंभर वर्षांचे मानले जाते. टेमघर धरणाचे आयुष्य अवघ्या एकोणीस वर्षांचे... त्यातही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यास २०१०-११ साली सुरुवात झाली. धरण बांधतानाच अत्यंत महत्त्वाच्या ग्राऊटींगचे (भेगा बुजविणे) कामच केले नाही. तसेच, धरणासाठी क्रश सँडचा अशास्त्रीय पद्धतीने केलेल्या वापरामुळे काही वर्षांतच धरणातून धोकादायक पाणी गळती झाल्याची कबुली जलसंपदाच्या अधिकाºयांनी दिली. 

कृष्णा खोरे लवादामधे महाराष्ट्राच्या वाट्याला ५९४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी आले. पावणेसहा कोयना धरणे मावतील इतके हे पाणी होते. राज्याला हे पाणी २००० सालापूर्वी अडवायचे होते. अन्यथा पुन्हा पाणी वाटपाच्या नव्या सूत्राला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे १९९६ साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करुन अनेक धरणे बांधली. त्यातीलच टेमघर हे एक धरण. या धरणाचे काम २०० साली झाले. मात्र, त्याचे कामच निकृष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे अधिकारीही मान्य करीत आहेत. याबाबत माहिती देताना जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले, धरणाचे कामच निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यावेळी धरणा बांधताना नैसर्गिक वाळू उपलब्ध नसल्याने क्रश सँड वापरली. मात्र, या प्रकारच्या वाळूचा वापर करताना विशिष्ट पद्धतीच्या तंत्राचा वापर करावा लागतो. तो देखील केला नाही. धरणाचे काम झाल्यानंतर राहीलेल्या भेगा बुजविण्यासाठी ग्राऊटींग करावे लागते. ते कामही झाले नव्हते. धरणाचे ९८ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर वन विभागाने त्यांच्या ७ एकर जमीनीबाबत आक्षेप घेत काम थांबविले. त्यामुळे अपुरे राहीलेले कामही करता आले नाही. त्याची देखभालही पुरेशा प्रमाणात झाली नाही. त्यामुळे धरणातील गळती वाढली. 

देखभाल दुरुस्तीचा खर्च घेणार ठेकेदाराकडूनटेमघर धरणाची धरणाची ठेकेदार कंपनी श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन, प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन आणि श्रीनिवासा-प्रोग्रेसिव्ह या भागिदार कंपनी मार्फत ही कामे झाली. आता,संबंधित कंपन्या अस्तित्वात नाहीत. त्यांच्या प्रवर्तकांवर न्यायालयात तीन दावे दाखल आहेत. सध्या, धरणाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्या पैकी ५८ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, हा खर्च १४५ ते १५० कोटींवर जाईल. हा खर्च ठेकेदार कंपनीच्या प्रवर्तकांकडून वसूल करण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.   

टॅग्स :DamधरणWaterपाणी