शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

आधी आर्थिक मंदीमुळे आणि आता कोरोनामुळे घटले बांधकाम प्रस्ताव, पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 6:19 AM

बांधकाम व्यावसायिकांना सवलती देण्याची आवश्यकता

आधी आर्थिक मंदीमुळे आणि आता कोरोनामुळे घटले बांधकाम प्रस्ताव

पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम 

लक्ष्मण मोरे

पुणे : गेल्या काही वर्षांपासून असलेल्या आर्थिक मंदीमुळे आणि नंतर रेरा कायद्यामुळे कमी झालेले बांधकाम प्रस्ताव कोरोनामुळे आणखीनच कमी झाले असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. १ एप्रिलपासून ३१ मे पर्यंत अवघे १२ ते १५ प्रस्तावच पालिकेकडे दाखल झाले असून पालिकेला अवघे १ कोटी ७३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अधिकाधिक प्रस्ताव येण्याकरिता आगामी काळात व्यावसायिकांना काही सवलती देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गेल्या तीन चार वर्षात बांधकाम व्यवसाय आर्थिक मंदीमुळे खाली आला. त्यानंतर रेरा कायदा लागू झाल्यापासून पालिकेकडे परवानगीसाठी येणाºया प्रस्तावांमध्ये जवळपास ३० टक्क्यांची घट झाली. पालिकेच्या बांधकाम विभागाला ठरवून देण्यात आलेले आर्थिक लक्ष्यही साध्य करणे अवघड झाले आहे. पुण्यामध्ये आयटी कंपन्यांचे आगमन होऊ लागल्यावर पुण्याच्या उपनगरांचा झपाट्याने विस्तार झाला. उपनगरांमध्ये बांधकामाची लाटच आली. यासोबतच टाऊनशिप उभ्या राहिल्या. काही वर्षांपूर्वी शहरातील बांधकाम व्यवसायात आलेली मोठी तेजी आली होती. सुरुवातीला प्रतिसाद मिळालेला हा व्यवसाय मात्र गेल्या काही वर्षांत आर्थिक मंदीमुळे कमी झाला. त्यातच रेरा कायदा आणि जीएसटी आल्यामुळे व्यवसायाचे कंबरडे मोडल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.त्यातच आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र कर्फ्यु लावण्यात आला. पुण्यातील अन्य उद्योग व्यवसायांप्रमाणे बांधकाम व्यवसायही ठप्प झाला. जवळपास तीन महिने हा व्यवसाय बंद असल्याने कामगारांच्या रोजगराचाही प्रश्न निर्माण झाला. बांधकाम मजूर मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावी निघून गेले आहेत. लोकांकडे सध्या पैसे नसल्याने आणि आहेत ते पैसे जपून वापरावे लागत असल्याने नवीन घरांना आगामी वर्षभर कशी मागणी राहील याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सदनिका रिकाम्या पडलेल्या असतानाही घरांच्या किमती मात्र अद्यापही कमी झालेल्या नाहीत. घरांच्या मागणीअभावी या व्यवसायातील गुंतवणुकीचा ओघ घटल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे दरवर्षी नवीन आणि पुनर्विलोकनासाठीचे शेकडो प्रस्ताव दाखल होत असतात. परंतु, गेल्या दोन महिन्यात अवघे १२ ते १५ प्रस्तावच दाखल झाले आहेत. त्यामधून अगदी तुटपुंजे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीही अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न पालिकेला मिळाले होते. पालिकेने शासनाच्या निर्देशानुसार काही अटी घालत बांधकाम व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, सध्या कामगार मिळत नसल्याने काम सुरू करणे अवघड झाले आहे. बांधकाम व्यावसायिकांना विकसन शुल्कामध्ये सवलत देणे, दोन-तीन हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची परवानगी देणे आदी सवलती दिल्यास काही प्रमाणात फरक पडू शकेल असा अंदाज बांधला जात आहे.-----------------मंदीच्या झळा सोसत असतानाच आता बांधकाम व्यावसायिक कोरोनामुळे अधिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. रेरा, जीएसटीमुळेही व्यवसायाला फटका बसला आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सिमेंट विक्रेते, हार्डवेअर, वीज, वाळू, डस्ट व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.------------------पालिकेकडील दाखल प्रस्ताववर्ष                  एकूण दाखल नवीन प्रस्ताव प्रस्ताव

२०१७-१८-        ७५२२०१८-१९ - .     ७४३२०१९-२०-        ७२६२०२०-२१ - .     १५ (मे अखेर)

पालिकेचे घटत चाललेले उत्पन्नवर्ष             अपेक्षित उत्पन्न (कोटीत)     प्रत्यक्ष उत्पन्न (कोटीत)२०१५-१६            ७५१                              ७४४२०१६-१७            १०४५                            ७४४२०१७-१८            ११६५                            ५८०२०१८-१९            ८१५                              ६५४२०१९-२०            ८९९                              ७७० २०२०-२१ ७५० १.७३ (मे अखेर)

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय