शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो मार्गिकेवरील बांधकाम परवानग्या रखडल्या

By admin | Updated: September 23, 2014 06:48 IST

प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत ४ चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे

पुणे : प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत ४ चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे. त्याविषयीच्या नियमावलीनुसार दोन्ही बाजूच्या प्रभावित क्षेत्रात बांधकाम परवानगी देताना ‘मेट्रो सेल’चा ना हरकत दाखला आवश्यक आहे. परंतु, मेट्रोसाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही) सेल अस्तित्वात आली नसल्याने प्रभावित क्षेत्रात बांधकाम परवानग्या रखडल्या आहेत. त्यामुळे जणू विकासाला जॅमर लागला आहे. वनाज ते रामवाडी आणि चिंचवड ते कात्रज या दोन्ही प्रस्तावित मार्गांचा प्रस्ताव महापालिका व राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. मात्र, केंद्रातील विविध खात्यांच्या मान्यतेअभावी पुणे मेट्रोला मंजुरी रखडलेली आहे. दरम्यान, महापालिकेने मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तरतुदींची नियमावली नुकतीच प्रसिद्ध केली. त्यावर नागरिकांनी सुमारे पाच हजार हरकती-सूचना दाखल केल्या आहेत. त्यावर अद्याप सुनावणी झाली नसली, तरी नियमावली अंशत: लागू झालेली आहे. त्यामुळे मेट्रोमार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत देण्यात येणाऱ्या ४ एफएसआयवर अनेक नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत. नवीन नियमावलीनुसार मेट्रो प्रभावित क्षेत्रात बांधकाम परवानगी देताना ‘एसपीव्ही’ सेलचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु, पुण्यातील मेट्रोसाठीच्या एसपीव्हीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे रखडला आहे. त्यामुळे मेट्रो सेल अद्याप अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे मेट्रो प्रभावित क्षेत्रात बांधकाम परवानगीसाठी ना हरकत देण्याचे काम थांबलेले आहे. (प्रतिनिधी)