पुणेकरांसाठी दिलासा! कोरोनामुळे स्थगित झालेल्या समारंभाच्या तारखा बदलून मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 17:58 IST2020-05-14T17:46:50+5:302020-05-14T17:58:54+5:30

कोरोनामुळे नागरिकांना मंगलकार्य करावी लागली स्थगित

Consolation for Punekars! The dates of the ceremony postponed due to the corona will be changed | पुणेकरांसाठी दिलासा! कोरोनामुळे स्थगित झालेल्या समारंभाच्या तारखा बदलून मिळणार

पुणेकरांसाठी दिलासा! कोरोनामुळे स्थगित झालेल्या समारंभाच्या तारखा बदलून मिळणार

ठळक मुद्देपुण्यातील लॉन्स, मंगलकार्यालये यांचा नागरिकांना दिलासापुण्यातल्या मंगलकार्यालय, बँक्वेट हॉल, हॉटेल्स, केटरर्स यांचे बुकिंग आठ ते नऊ महिने आधीच

पुणे: बहुतांश व्यवसायांप्रमाणे मंगलकार्यालये आणि केटरर्स यांना देखील कोरोना महामारीचा जोरदार फटका बसला आहे. हा हंगाम खरंतर लग्नसराई व मंगलकार्याचा आहे. पुण्यातल्या मंगलकार्यालय, बँक्वेट हॉल, हॉटेल्स, केटरर्स यांचे बुकिंग आठ ते नऊ महिने आधीच झाले आहे. मात्र कोरोनामुळे नागरिकांना मंगल कार्य स्थगित करावी लागली. कोरोनामुळे स्थगित झालेल्या कार्यक्रमांना पुढील उपलब्धतेप्रमाणे बुकिंगच्या तारखा बदलून देण्याचा निर्णय लॉन्स व मंगलकार्यालयांचे मालक, चालक यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
  ग्राहकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयात सर्व ग्राहक साथ देतील अशी आशा किशोर सरपोतदार, अरुणा ढोबळे आणि सुरेश शर्मा यांनी व्यक्त केली. 
  लॉकडाऊनच्या कारणामुळे सर्वच सांस्कृतिक व सामाजिक समारंभांवर बंधने आली आहेत. दि 15 मार्च नंतरची सर्व लग्नकार्य व इतर मंगल कार्य स्थगित करण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांप्रमाणे सभागृहचालक व केटरर्स यांना मोठा फटका बसला. पुण्यात 110 कार्यालये आणि 75 लॉन्स सहित शेकडो हॉटेल्स आणि केटरर्स मार्च ते जून मध्ये होणाऱ्या मंगलकार्यालयांसाठी ज्यादा कामगारांची नियुक्ती करतात. यावर्षी  कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे पगारी कामगार सुद्धा बसून आहेत. परिस्थिती विपरीत असली तरी ज्या नागरिकांनी मंगलकार्यालय व केटरिंगसाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम देऊन बुकिंग केले आहे. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Consolation for Punekars! The dates of the ceremony postponed due to the corona will be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.