शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 12:01 PM

पलूसचे आमदार आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या चारचाकीला बुधवारी रात्री मोठा अपघात झाला

ठळक मुद्देपलूसचे आमदार आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या चारचाकीला बुधवारी रात्री मोठा अपघात झाला. कदम यांच्यासह चालक आणि त्यांच्या सचिवांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातात गाडीचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे समजते. 

पुणे - पलूसचे आमदार आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्या चारचाकीला बुधवारी रात्री मोठा अपघात झाला. मात्र सुदैवाने कदम यांच्यासह चालक आणि त्यांच्या सचिवांना कोणतीही दुखापत झाली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 12.30 च्या दरम्यान आमदार कदम यांची मर्सिडीज कार मुंबईहून पुण्याला येत होती. त्यावेळी राजगड बंगला या त्यांच्या बीएमसीसी महाविद्यालयासमोरील घरासमोर दुचाकीस्वाराला वाचवताना गाडीची झाडाला धडक बसली. धडक मोठी असली तरी एअर बॅगमुळे कदम बचावले असून फक्त त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. या अपघातात गाडीचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे समजते. 

'मुंबईहून पुण्याला येत असताना माझ्या गाडीला अपघात झाला हे वृत्त खरे आहे. काल रात्री पुण्यामध्ये गाडी झाडाला धडकल्याने अपघात झाला. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही. मी व ड्रायव्हर दोघेही सुखरूप आहोत. माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने मी सुखरूप आहे' अशी माहिती कदम यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे. तसेच प्रकृतीबाबत कोणत्याही अफवांना जनतेने बळी पडू नये असे आवाहनही विश्वजित कदम यांनी केले आहे.

 

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेसAccidentअपघातPuneपुणे