Zilla Parishad Election 2026: पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:07 IST2026-01-21T16:06:24+5:302026-01-21T16:07:46+5:30

ही आघाडी केवळ सत्ताकारणापुरती मर्यादित नसून संविधानविरोधी आणि जातीवादी शक्तींना रोखण्यासाठीची राजकीय एकजूट असल्याचे नेत्यांनी सांगितले

Congress, Vanchit Bahujan alliance for Zilla Parishad elections in Pune; contest together on 73 seats | Zilla Parishad Election 2026: पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत

Zilla Parishad Election 2026: पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत

पुणे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवंचित बहुजन आघाडी यांची अधिकृत आघाडी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ जागा व पंचायत समितीच्या १४६ जागांवर ही आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार असून याची घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग पाटील व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केली.

जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ जागा तसेच त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या १४६ जागांवर काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी संयुक्तपणे उमेदवार उभे करणार आहेत. या आघाडीची अधिकृत घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

ही आघाडी केवळ सत्ताकारणापुरती मर्यादित नसून संविधानविरोधी आणि जातीवादी शक्तींना रोखण्यासाठीची राजकीय एकजूट आहे. बहुजन, वंचित, शोषित घटकांचे मतदान विभागले जाऊ नये आणि सामाजिक न्यायाच्या विचारधारेसाठी प्रभावी पर्याय उभा राहावा, हा या महाआघाडीचा मुख्य उद्देश असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.

या आघाडीची उमेदवार निवड प्रक्रिया तळागाळातील चर्चांवर आधारित असून, दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांनी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून संभाव्य उमेदवारांची नावे सुचवली आहेत. या यादीला दोन्ही पक्षांच्या जिल्हा पातळीवरील नेतृत्वाने अंतिम मान्यता दिली आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेनंतर कोणती जागा कोणत्या पक्षाकडे राहणार, याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे. या वेळी प्रदेश कॉंग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, जिल्हा परिषदेसाठी नियुक्त केलेले निरीक्षक प्रशांत जगताप, वंचित बहुजन आघाडीचे विशाल गवळी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title : पुणे जिला परिषद चुनाव के लिए कांग्रेस, वंचित बहुजन गठबंधन।

Web Summary : कांग्रेस और वंचित बहुजन ने जिला परिषद चुनाव के लिए गठबंधन किया, 73 सीटों पर चुनाव लड़ेंगे। उद्देश्य: सामाजिक न्याय, विभाजनकारी ताकतों को रोकना।

Web Title : Congress, Vanchit Bahujan Alliance for Pune Zilla Parishad Election.

Web Summary : Congress and Vanchit Bahujan form alliance for Zilla Parishad election, contesting 73 seats. Aim: social justice, block divisive forces.