शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

पुणे काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; स्थानिक पातळीवर कही खुशी कही गम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 9:23 PM

पदांचा स्विकार आणि जाहीर नकारसुद्धा

पुणे: काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी दिल्लीहून जाहीर झाली आणि त्यातल्या पुण्यामधील नियुक्त्यांनी एकाच वेळी आनंद आणि निराशाही निर्माण झाली.

रमेश बागवे यांचे शहराध्यक्षपद कायम राहिले म्हणून त्यांनी आजच लगेच ब्लॉक बैठका घेण्यास सुरुवात केली तर त्या पदासाठी इच्छुक असलेल्या आजीमाजी नगरसेवकांनी खासगीत नाराजी जाहीर करण्यास सुरुवात केली. बैठकीकडे अर्थातच पाठ फिरवली.

प्रदेश प्रवक्ता पदावर असलेल्या गोपाळ तिवारी यांना प्रदेश सचिव करण्यात आले. त्यांनी पक्षाच्या व्हाटस अँप ग्रुपवर ही तर पदावनती आहे असे म्हणत पद स्विकारण्यासच नकार दिला. याच पदावर महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे यांची नियुक्ती झाली. त्यांनी फेसबूकसह सगळ्या समाज माध्यमांवर थेट सोनिया गांधी राहूल गांधींपासून सर्व पदाधिकार्यांचे जाहीर आभार मानले.

प्रदेश उपाध्यक्ष असलेले मोहन जोशी यांना कोणतेही पद नाही तर अँड. अभय छाजेड यांना सरचिटणीस पदावर कायम ठेवण्यात आले. दोघेही माजी शहराध्यक्ष, बर्याच वर्षांचे अनुभवी यामुळे अळी मिळी गुप चिळी असे शांत आहेत. पण त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की ही गोष्ट झाली तरी कशी?

उल्हास पवार हेही आता सांगेन गोष्टी युक्तीच्या चार सारखे आहेत, पण त्यांनाही स्थान मिळाले. त्यामुळे ते समाधानी तर का जागा अडवता ही त्यांच्या नियुक्तीवरची त्यांच्या इतक्याच ज्येष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली.माजी आमदार अनंत गाडगीळ प्रवक्तेपदी आरूढ झाले, पण ते पुण्याचे कसे काय असा प्रश्न त्यांच्या मुंबईतील रहिवासावरून नाही तर  पुण्यातील सततच्या गैरहजेरीवरून विचारला जात आहे.

--//

मागची सलग पाच वर्षे काँग्रेसभवनची पायरीही न चढता प्रदेश कार्यकारिणीत आपटी न खाता जीत राहिलेल्या आणखी एका नियुक्तीचीही जोरदार चर्चा काँग्रेस भवनात आहे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस