काँग्रेसच्या महिलांचा चुलीवर स्वयंपाक; केंद्र सरकारचा निषेध करत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 04:46 PM2021-07-09T16:46:07+5:302021-07-09T16:46:13+5:30

आंदोलनातून त्यांना आम्ही जागू करू आणि गादी सोडायला भाग पाडू असा निर्धार सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला

congress Protest in front of the District Collector's Office in Pune | काँग्रेसच्या महिलांचा चुलीवर स्वयंपाक; केंद्र सरकारचा निषेध करत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

काँग्रेसच्या महिलांचा चुलीवर स्वयंपाक; केंद्र सरकारचा निषेध करत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

googlenewsNext

पुणे: केंद्र सरकारचे महागाईवर कसलेच नियंत्रण राहिलेले नाही. सामान्यांचे जगणे हैराण झाले आहे. सरकार झोपले आहे, आमच्या आंदोलनातून त्यांना आम्ही जागू करू आणि गादी सोडायला भाग पाडू असा निर्धार सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. प्रदेश काँगेसच्या आदेशानूसार शहर महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी आंदोलन झाले. रस्त्यावर स्वयंपाक करून महिलांंनी केंद्र सरकारचा निषेध केला.

विशवजीत कदम यांनी आंदोलनाला भेट देऊन घोषणा दिल्या. महिला आघाडी शहराध्यक्ष सोनाली मारणे यांनी काँग्रेस सरकारच्या काळात इंधनदरात थोडीही वाढ झाली तरी ओरडा करणार्या स्म्रुती इराणी यांंनी आता मोदींना जाब विचारावा अशी टीका केली. 

शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी महिला आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना महागाईच्या विरोधात निवेदन देण्यात आले. 

Web Title: congress Protest in front of the District Collector's Office in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.