शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या वर्धापनदिनाला सामसूम !

By admin | Updated: March 10, 2015 04:56 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) नवव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम शहर कार्यालयात सोमवारी झाला. मात्र, मनसेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) नवव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम शहर कार्यालयात सोमवारी झाला. मात्र, मनसेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली होती. पक्षांतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, त्याचे सावट वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर दिसून आले. मनसेच्या स्थापनेला सहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे महापालिकेत फेब्रुवारी २०१२ च्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. महापालिकेत पाच वर्षांपूर्वी अवघे आठ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, पुणेकरांनी तब्बल २९ नगरसेवक निवडून दिले. त्यामुळे मनसेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. शहर संघटन व विद्यार्थी संघटनेसाठी एकाऐवजी दोन अध्यक्ष नियुक्त केल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. पक्षांतर्गत गटबाजीमुळे संघटना बांधणीला फटका बसला आहे. मंगळवार पेठ व हडपसर येथील प्रभागाच्या पोटनिवडणुकीत मनसेला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. पक्षामध्ये नगरसेवकांपेक्षा नगरसेविकांची संख्या अधिक आहे. तरीही महापालिकेच्या स्थायीसह विविध महत्त्वाच्या समिती व पदावर महिलांना संधी मिळालेली नाही. मनसेला शहरात कणखर व आक्रमक नेतृत्व नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आहे. त्यामुळे मनसेचा ९ वा वर्धापनदिन असूनही शहरात पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आपल्या भागात कार्यक्रम घेतल्याचे दिसून आले नाही. मुंबईवरून एकही नेता पुण्यात आला नाही. तसेच, पुण्यातूनही पदाधिकारी मुंबईतील वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला गेले नसल्याचे सांगण्यात आले. केवळ डेक्कन येथील शहर कार्यालयात शहराध्यक्ष बाळा शेडगे, प्रकाश ढोरे, गटनेते बाबू वागसकर यांच्यासह मोजकेच लोक उपस्थित होते. (प्रतिनिधी)