शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मंडळांकडून गणेशमूर्तीबाबत पुरेपूर दक्षता

By admin | Updated: July 9, 2015 03:10 IST

मंडळांच्या मंदिरांची, मूर्तींची पाहणी केली असता मूर्तीवर मोजकेच दागिने ठेवून अन्य दागिने लॉकरमध्ये ठेवण्याची खबरदारी मंडळांनी घेतल्याचे दिसून आले.

पुणे : मानाच्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेश मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरट्याने डाव साधल्यानंतर मध्यवर्ती भागातील काही मंडळांच्या मंदिरांची, मूर्तींची पाहणी केली असता मूर्तीवर मोजकेच दागिने ठेवून अन्य दागिने लॉकरमध्ये ठेवण्याची खबरदारी मंडळांनी घेतल्याचे दिसून आले. हत्ती गणपती, भाऊ रंगारी गणपती, विश्रामबाग मित्र मंडळ, राजाराम मंडळ, नागनाथ पार गणेशोत्सव मंडळ, बाबू गेनू मंडळ, चिमण्या गणपती आदी मंडळांच्या गणेशमूर्तींची, मंदिरांची व सुरक्षाव्यवस्थेची पाहणी लोकमत चमूने केली. मानाच्या तुळशीबाग मंडळाच्या ‘श्रीं’ना चांदीचे दागिने आहेत. या मंडळाचे विवेक खटावकर म्हणाले, ‘‘रात्रभर सुरक्षारक्षक असतो. दिवसभर विक्रेते असतात. त्यामुळे सुरक्षा निर्माण झाली आहे. मध्यंतरी काही प्रकार झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे.’’ मानाच्या गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी म्हणाले, ‘‘आमच्या ‘श्रीं’ना उत्सव काळात १० दिवस दागिने असतात. विसर्जन झाले, की सेफ लॉकरमध्ये दागिने ठेवतो.’’जिलब्या गणपती मंडळाचे प्रसिद्धिप्रमुख मकरंद माणसीकर म्हणाले, ‘‘देवाच्या अंगावर फक्त चांदीचा हार असतो. बाकीचे दागिने लॉकरमध्ये असतात. मंदिराला आतून लोखंडी शटर व बाहेरून बुलेटप्रूफ काच असल्याने सुरक्षा आहे. त्वष्टा कासार समाज संस्था गणेश मंदिर, कसबा पेठसुरक्षिततेसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. गणपतीच्या अंगावरील सोने हे फक्त गणेश जयंती व गणेशोत्सवालाच मूर्तीवर चढवले जातात. उत्सवांच्या वेळी २४ तास मूर्तीच्या जवळ कार्यकर्ते असतात. - हृषीकेश घोडके, अध्यक्ष गावकोस मारुती संस्था गणेश मंडळ, कसबा पेठमूर्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले असतात. गणेशोत्सवातच ते गणपतीच्या अंगावर घातले जातात. त्यामुळे सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे काहीच कारण नाही. मंदिरामध्ये फक्त मूर्ती असते. - दत्तात्रय नलावडे, अध्यक्षजनार्दन पवळे संघ मित्र मंडळ, कसबा पेठआमची दोन मंदिरे आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचा फायदा असा, की काही महिन्यांपूर्वी मंदिराच्या शेजारील दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरालाही आम्ही पकडून दिले होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहिले पाहिजे. आमचे कार्यकर्ते पहाटेपर्यंत मंदिरात बसलेले असतात. - दिनेश डाखवे, अध्यक्षश्रीमंत पेशवे गणेश मंडळ, कसबा पेठतीन वर्षांपूर्वी या मंदिरातील दानपेटी फोडली होती; पण आता तेथे आठ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या अंगावरील सर्व दागिने रोज संध्याकाळी काढून सुरक्षित ठेवले जातात. लोखंडी जाळीचा दरवाजा असल्यामुळे चोरी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सदस्य चंद्रकांत जोशी यांनी दिली. - गिरीश बापट, अध्यक्ष