जोपर्यंत बाबा आढाव माफी मागत नाही तोपर्यंत हमाल पंचायतीशी पूर्णपणे असहकार : दि पूना मर्चट चेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 08:17 PM2020-10-27T20:17:01+5:302020-10-27T20:18:42+5:30

मार्केट यार्डातील " दोन नंबरची संस्कृती कोरोनापेक्षा भयानक आहे"असे विधान केले होते.

Complete non-co-operation with Hamal Panchayat unless Baba Adhav apologizes | जोपर्यंत बाबा आढाव माफी मागत नाही तोपर्यंत हमाल पंचायतीशी पूर्णपणे असहकार : दि पूना मर्चट चेंबर

जोपर्यंत बाबा आढाव माफी मागत नाही तोपर्यंत हमाल पंचायतीशी पूर्णपणे असहकार : दि पूना मर्चट चेंबर

googlenewsNext
ठळक मुद्देडाॅ.बाबा आढाव यांच्या विधानाचा दि पूना मर्चंटस् चेंबर कडून निषेध 

पुणे : हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी तोलणार संघटनेच्या आंदोलनाच्या वेळेस मार्केट यार्डातील " दोन नंबरची संस्कृती कोरोनापेक्षा भयानक आहे" असे विधान केले होते. डाॅ. आढाव यांच्या या विधानाचा दि पूना मर्चंट चेंबरतर्फे जाहिर निषेध करत जोपर्यंत बाबा आढाव माफी मागत नाही, तोपर्यंत हमाल पंचायत या संघटनेशी कोणतीही चर्चा अथवा वाटाघाटी करणार नसल्याची ठाम भूमिका चेंबरने  घेतली आहे. 

याबाबत दि पूना मर्चंट चेंबरने लेखी पत्रक काढले असून यामध्ये बाबांचे वय झाल्यामुळे त्यांचा तोल ढासळला आहे,  अशी आमची समजूत झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आम्ही काम करतो. त्यांची आमच्यावर देखरेख असते. आमचे सभासद दरवर्षी गुळ भूसार विभागातून सुमारे १८ कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा सेमचा भरणा करतात. दोन नंबर संस्कृतीच्या देखरेखीकरिता सरकारी यंत्रणा सक्षम आहेत. बाबांनी स्वतःचे आत्मचिंतन करावे. आपले वारणार कामगार जेथे वाराई व हमाली ८०० ते १००० रुपये होते. तेथे वाराई व हमाली दादागिरी व अडवणूक करून दुप्पट किंवा तिप्पट घेतात. दादागिरी करणे, डमीचा उपयोग करणे या गोष्टींचा सर्वप्रथम बाबांनी विचार करायला हवा. व्यापारी काय काम करतात किंवा नाही यात बाबांनी लक्ष देण्याची गरज नाही. २८ तोलणार हे व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवत होते, असे बाबांचे म्हणणे आहे.

तोलणार हे तोलाईची काम सोडून इन्स्पेक्टरचे काम करीत होत का? वरील विधानांची बाबा आढाव हे जाहिर माफी मागत नाहीत तोपर्यंत दि पूना मर्चटस् चेंबरतर्फे हमाल पंचायतशी कोणतेही सहकार्य व चर्चा यापुढे करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी अशी माहिती दि पूना मर्चेटस्
चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. 

Web Title: Complete non-co-operation with Hamal Panchayat unless Baba Adhav apologizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.