शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारदारांना ग्राहक मंचाने दिला दणका

By admin | Updated: August 23, 2015 04:34 IST

माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणारी व्यक्ती ही संबंधित संस्थेची ग्राहक होत नाही. माहिती अधिकारातून माहिती न मिळाल्याची तक्रार ग्राहक मंचात दाखल करणे म्हणजे वेळेचा

पुणे : माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणारी व्यक्ती ही संबंधित संस्थेची ग्राहक होत नाही. माहिती अधिकारातून माहिती न मिळाल्याची तक्रार ग्राहक मंचात दाखल करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. माहिती मागणाऱ्या संस्थेलाही विनाकारण खर्चात पाडल्याचा निष्कर्ष काढत दोन तक्रारदारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची नुकसानभरपाई सहा आठवड्यांच्या आत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कायदेविषयक निधीमध्ये जमा करावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्या क्षितिजा कुलकर्णी आणि मोहन पाटणकर यांनी हा आदेश दिला आहे. हरिभाऊ रघुनाथ काकडे (रा. पौड रस्ता, कोथरूड) व व्यंकटेश धोंडो कुलकर्णी (रा. आनंदनगर पार्क सोसायटी, पौड रस्ता) अशी या तक्रारदारांची नावे आहेत. काकडे व कुलकर्णी हे सेवानिवृत्त असून, त्यांनी माहिती अधिकारांतर्गत डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून माहिती मागविली होती. परंतु, माहिती उपलब्ध न झाल्याने त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास झाला. ही संस्थेच्या सेवेतील त्रुटी असल्याचे सांगत कुलकर्णी यांनी नुकसान भरपाईपोटी ९० हजार रुपये तर काकडे यांनी ७५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. तसेच काकडे यांनी अहिल्यादेवी हायस्कूल येथेही माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता व तेथेही माहिती न मिळाल्याने नुकसानभरपाई म्हणून ९० हजार रुपयांची मागणी ग्राहक मंचातील तक्रारीत केली होती. अर्जदार ग्राहक होत नाहीतक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीला डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेने व हायस्कूलने विरोध केला. तक्रारदार हे संस्थेचे ग्राहक नसल्याने ही तक्रार ग्राहक मंचासमोर चालविता येणार नाही. माहिती अधिकार अधिनियम २००५ अनुसार यासाठी वेगळी तरतूद असल्याचा युक्तिवाद करताना अर्जदार हे ‘ग्राहक’ होत नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मंचाने संस्थेच्या बाजूने निकाल दिला. तक्रारदारांनी केलेली तक्रार म्हणजे ग्राहक मंचाच्या वेळेचा अपव्यय आहे, त्याचप्रमाणे संस्थेला विनाकारण खर्चामध्ये पाडले असल्याची बाब निष्पन्न झाली असल्याचा निष्कर्ष मंचाने नोंदविला व काकडे व कुलकर्णी यांना तीनही तक्रारींमध्ये प्रत्येकी ५ हजार रूपये दंड मंचाच्या कायदेविषयक निधीमध्ये जमा करण्याचा आदेश दिला.