मुलांना अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 19:04 IST2019-05-16T19:02:33+5:302019-05-16T19:04:52+5:30

लहान मुलगा पडला म्ह्णून मोठ्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या वडिलांना पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. 

A complaint filed against the father for beating his son | मुलांना अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांवर गुन्हा दाखल 

मुलांना अमानुष मारहाण करणाऱ्या वडिलांवर गुन्हा दाखल 

पुणे :लहान मुलगा पडला म्ह्णून मोठ्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या वडिलांना पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील विमानतळ भागात राहणाऱ्या कुटुंबात तीन अल्पवयीन मुले असून त्यांचे वय अनुक्रमे ११वर्ष, ९ वर्ष आणि त्यापेक्षा कमी असे आहे. यातील दोन मोठे भाऊ लहान भावाशी खेळत असताना अचानक तो पलंगावरून खाली पडला. त्यामुळे संताप अनावर झालेल्या वडिलांना मोठ्या दोन मुलांना केबल वायरने अमानुष मारहाण केली. या प्रकरणी बाळ हक्क कृती समितीच्या कार्यकर्त्याने तक्रार नोंदवली आहे. यात वडिलांनी ११ वर्षांच्या मुलाच्या डोक्याच्या मागे मारून जखमी केले असेच हात आणि पायावरही मारले आहे. ९ वर्षांचा मुलगाही यातून सुटला नसून त्याच्या छातीवर मारण्यात आले आहे. हा प्रकार सुरु असताना ही मुले जोरजोरात ओरडत होती. त्यावेळी हा आवाज ऐकून एका व्यक्तीने बाल हक्क कृती समितीला कळविले. त्यानुसार समितीने प्रत्यक्ष माहिती घेऊन विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये बाल हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नंतर पोलिसांनी वडिलांना अटक केली असून न्यायालयात हजर केल्यावर आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Web Title: A complaint filed against the father for beating his son